शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
3
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
4
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
5
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
6
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
7
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
8
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
9
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
10
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
11
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
12
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
13
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
14
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
15
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
16
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
17
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
18
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
19
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
20
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब

वाचनालये आणि शाळा समाजाची ऊजाकेंद्रे, सुशिलकुमार शिंदे यांचे मत, चुंगी येथे उत्कर्ष वाचनालयाच्या इमारतीचे उदघाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 15:33 IST

ग्रामीण भागात शाळा आणि सार्वजनिक वाचनालये समाजाला ऊर्जा पुरवण्याचे काम करतात म्हणूनच माज्या खासदार निधीतून या कामांना मोठा निधी दिला ,अशा संस्थामुळे सुदृढ विचारांची पिढी निर्माण होते , असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी चुंगी येथील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले

ठळक मुद्देअक्कलकोट तालुक्यातील चुंगी येथील उत्कर्ष सार्वजनिक वाचनालयाच्या विस्तारीत इमारतींचे उदघाटन  आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी तालुक्यात केलेल्या बोरी धरण ,आठ एकरचा स्लॅब रद्द करणे ,एकरुख योजनेचा सुप्रमा  आदी कामी शिंदे यांनी झुकते माप दिल्याचे सांगून कृतज्ञता व्यक्त केलीलोकमतचे संपादक राजा माने यांनी चुंगी येथील विविध उपक्रमांचे कौतुक करीत उत्कर्ष वाचनालयाच्या वाटचालीला शुभेच्छा दिल्या .

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ९ : ग्रामीण भागात शाळा आणि सार्वजनिक वाचनालये समाजाला ऊर्जा पुरवण्याचे काम करतात म्हणूनच माज्या खासदार निधीतून या कामांना मोठा निधी दिला ,अशा संस्थामुळे सुदृढ विचारांची पिढी निर्माण होते , असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी चुंगी येथील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले       अक्कलकोट तालुक्यातील चुंगी येथील उत्कर्ष सार्वजनिक वाचनालयाच्या विस्तारीत इमारतींचे उदघाटन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे होते.व्यासपीठावर  लोकमतचे संपादक राजा माने ,काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके ,जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुदीप चाकोते , सोलापूर डिसीसी बँकेचे संचालक सुरेश हसापुरे ,सोलापूर मनपाचे पक्षनेते चेतन नरोटे ,माजी सभापती श्रीशैल नरोळे ,वाचनालयाचे संस्थापक प पू गोरक्षनाथ महाराज ,चुंगीच्या सरपंच आशाराणी गड्डे आदींची उपस्थिती होती     प्रारंभी वाचनालयाचे अध्यक्ष नारायण चव्हाण यांनी प्रास्ताविकातून वाचनालयाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.यावेळी बोलताना शिंदे म्हणाले , अनेकदा दिलेला निधी त्याच कामासाठी खर्च होत नाही,हा आपला अनुभव आहे , शाळा आणि वाचनालयांना दिलेला निधी सत्कारणी लागतो .अशा संस्थांना शासन मदतीची गरज असते       आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी तालुक्यात केलेल्या बोरी धरण ,आठ एकरचा स्लॅब रद्द करणे ,एकरुख योजनेचा सुप्रमा आदी कामी शिंदे यांनी झुकते माप दिल्याचे सांगून कृतज्ञता व्यक्त केली .यापुढच्या काळात एकरुख योजना मार्गी लावण्यासाठी आपण लक्ष्य केंद्रित करणार असल्याचे त्यानि सांगितले       लोकमतचे संपादक राजा माने यांनी चुंगी येथील विविध उपक्रमांचे कौतुक करीत उत्कर्ष वाचनालयाच्या वाटचालीला शुभेच्छा दिल्या . उमेशचंद्र काजळे ,हरिदास जाजनुरे ,लक्ष्मी जाधव यांचा सेवनिवृतिनिमित्त सत्कार करण्यात आलं.  अशोक काजळे यांनी भाषण केले.पत्रकार दत्ता थोरे यांनी आभार मानले.कार्यक्रमास  जेष्ठ पत्रकार शांतकुमार मोरे ,व्यंकट मोरे ,?ड बापूसाहेब देशमुख , सुरेश माने ,माजी सरपंच सुभद्रा रेड्डी , प्रहार संघटनेचे राजसाहेब चव्हाण ,संजीव पाटील ,बालाजी माने ,विश्वनाथ भोसले ,नारायण धुमाळ ,सैफन शेख ,विनोद थोरे ,निवृत्ती चव्हाण , संजय मठ ,जनार्धन चव्हाण ,यांची उपस्थिती होती

टॅग्स :SolapurसोलापूरSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदे