शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

नागरिक कार्यालयात, तहसिलदार-नायब तहसिलदार गेटच्या बाहेर!

By संताजी शिंदे | Updated: April 5, 2023 19:24 IST

बेमुदत आंदोलन : तहसिलस्तरावरील कामे ठप्प; ग्रेडपेसाठी आंदोलन सुरूच!

संताजी शिंदे 

सोलापूर : राजपत्रित वर्ग-२ प्रमाणे आम्हालाही ग्रेडपे देण्यात यावा या मागणीसाठी तहसिलदार, नायब तहसिलदार यांचे आंदोलन सुरू आहे. या प्रकारामुळे कार्यालयीन कामकाजावर परिणाम होत आहे. नागरिक कार्यालयात जातात, तेव्हां त्यांना साहेब गेट बाहेर सुरू असलेल्या आंदोलनात आहेत असे सांगितले जात आहे.      

राज्यभरातील दोन हजार २०० नायब तहसीलदार आणि ६०० तहसीलदार यांनी ३ एप्रिल पासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. राजपत्रित वर्ग-२ नायब तहसीलदार या कार्यकारी पदाच्या विद्यमान ग्रेड-पे देण्यात यावा या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. सोलापुरात काम बंद आंदोलनाचा दुसरा दिवस होता, त्यामुळे प्रशासकीय पातळीवरील बरीच कामे ठप्प झाल्याचे निदर्शनास येत आहे. नागरीक आपले काम झाले की नाही, हे पाहण्यासाठी तहसिल कार्यालयात जातात तेव्हां त्यांना तहसिलदारांची सही झाली नाही, ते आंदोलनात आहेत, त्यामुळे काम कधी होईल सांगता येत नाही असे सांगितले जात आहे.      

राज्य सरकारने १३ ऑक्टोबर १९९८ रोजी नायब तहसीलदार संवर्गाचा दर्जा वर्ग-३ वरून वर्ग-२ असा केला होता. मात्र वर्ग-२  प्रमाणे वेतनवाढ केली नाही. वर्ग-२ साठी ग्रेड पे ४८०० इतका आहे. वर्ग-३ साठी ग्रेडपे ४३०० इतका होता, तो तेवढाच ठेवण्यात  आला  आहे, त्यात वाढ केली नाही. मागील २५ वर्षांपासून राज्यातील नायब तहसीलदार वर्ग-२ या पदावर काम करतात. मात्र वर्ग-३ चे वेतन घेत आहेत. त्यामुळे नायब तहसीलदारांनाही इतर विभागांतील वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांएवढा ग्रेड पे वाढवून द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने केली आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरagitationआंदोलन