शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात यंदा गोमय लाकडांनं पेटली होळी

By विलास जळकोटकर | Updated: March 7, 2023 18:55 IST

वृक्षतोडीला फाटा : ११ गोशाळेत तयार झाल्या लाखभर गोवऱ्या

विलास जळकोटकर, सोलापूर : होळीच्या पारंपरिक सणाला होळी पेटवण्यासाठी वापर मोठ्या प्रमाणात लाकडांनी व्हायचा, यंदा सोलापूरकरांनी त्याला फाटा देत गोवऱ्या, गोवऱ्यांपासून तयार केलेल्या लाकडांचा, नारळांच्या फांद्या, झुडपांचा वापर करुन पर्यावरण पूरक होळी अनेकांनी प्राधान्य दिले. या निमित्ताने बेसुमार होणाऱ्या वृक्षतोडीलाही आळा बसला. यासाठी शहरातील ११ गोशाळांमधून जवळपास लाखभर गोवऱ्या बनवण्यात आल्या.जुळे सोलापुरातील विशालनगर गणेशोत्सव मंडळानेही यंदा तरुणाई आणि शाळकऱ्यांच्या साथीने नारळाच्या फांद्या आणि गोमय लाकडांना प्राधान्य दिले. यासाठी मंडळाच्या उत्साही तरुणाईनं १२१ नग नारळाच्या फांदया व ३० किलो गोमय लाकडे वापरुन वृक्षतोड न करता मोठ्या उस्तहत् होळीचा सन साजरा केला, तसेच् होळीच्या पूजेवेळी पारंपरिक वाद्य हलगी, ढोल, ताशाचा वापर केला. या उत्सवासाठी विशालनगरमधील महिलांनीही उत्स्फूर्त हजेरी लावली.

गाईच्या शेणा पासून गोमय लाकडे तयार करणे, ही संकल्पना सोलापुरात नवीन आहे. या गोमय लाकडांचा प्रथमच यंदाच्या वर्षी वापर करण्यात आला. या उपक्रमासाठी वीरेंद्र खेडगीकर, विरेश खेडगीकर, विपुल बिराजदार, युवराज गावडे, अथर्व शेंडे, सनय वाघचवरे, अथर्व वैद्य, वेदांत पाटील, अरव हत्ते, अंकुर येलीकर, निनाद पाटील, शैलेश जाधव, मयूर पानकर यांनी परिश्रम घेतले.

गोशाळेतल्या गोवऱ्यांचा वापर

होळी सणाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील हिप्परग्याच्या तेजोम्रत गोशाळेचे संचालक देविदास मिटकरी यांनी गोमय लाकूड तयार करण्याचा नवा प्रयोग यंदा केला. गायीच्या शेणापासून तयार केल्या जाणाऱ्या लाकडाने यंदा शहरात विविध ठिकाणी होळी पेटवण्यात आली. यासाठी एका लाकडाची किंमत साधारणता दहा रुपये ठेवली. त्याची रुंदी तीन इंच आणि लांबी दोन फूट अशी होती. तसेच शहरातील ११ गोशाळांमधून तयार केलेल्या जवळपास लाखभर गोवऱ्यांचा यंदाच्या होळीत वापर करण्यात आला.वृक्षतोडीवर पर्याय

वृक्षतोडीवर पर्याय म्हणून शेणापासून तयार केलेल्या लाकडांना अनेकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या लाकडांपासून कोणत्याही प्रकारचे वायू प्रदूषण होणार नसून उलट याचा सुगंध संपूर्ण वातावरणात प्रसन्न करणारा आणि शरीराला उपाय कारक असल्याचे मिटकरी यांचे म्हणणे आहे. सेना पासून तयार केलेल्या साधारण तीन इंच आणि दोन फूट अशा लांबीच्या लाकडाची एक काठी साधारण एका किलोची होती.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Solapurसोलापूर