शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात सुनबाई न सांगता कार्यक्रमाला गेली म्हणून तिच्या हातावर ब्लेडने केले वार

By विलास जळकोटकर | Updated: September 7, 2023 17:10 IST

स्नेहा यांच्या सासूने राहत्या घरी रात्री सातच्या सुमारास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

सोलापूर : न सांगता कार्यक्रमाला गेली म्हणून पतीने हात पकडला आणि सासूने ब्लेडने तिच्या हातावर मारुन जखमी केले. या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरुन सासूसह पतीविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. विडी घरकूल येथे ही घटना घडली.या प्रकरणी स्नेहा गिरीधर टंकसाळ (वय- २४, रा. तुळशांती नगर, विडी घरकूल, सोलापूर) या विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार सासू सरस्वती रामचंद्र टंकसाळ व पती गिरीधर रामचंद्र टंकसाळ या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी स्नेहा ही सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास कार्यक्रमाला गेली होती. यावरुन स्नेहा यांच्या सासूने राहत्या घरी रात्री सातच्या सुमारास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर स्नेहाला तिचा पती गिरीधर याच्यासमोर उभे करुन विचारणा केली. पतीनेही ‘तु मला न सांगता कुठे गेली होती. तू घर सोडून बाहेर का गेली’ असे म्हणत मारहाण केली. पतीने स्नेहाचा हात पकडला, सासूने घरात असलेली दाढीची ब्लेड तिच्या डाव्या हातावर, मनगटावर मारुन जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकाराबद्दल एमआयडीसी पोलीस ठाण्यात जावून स्नेहाने पती व सासू विरोधात तक्रार दिल्याने गुन्हा नोंदला आहे. तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी