शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

संबळाच्या तालावर 'आई राजा उदो उदो'चा गजर; सोलापुरात प्रमुख पाच देवींपुढे झाली घटस्थापना

By काशिनाथ वाघमारे | Updated: October 15, 2023 16:42 IST

गणेशपेठेतील भावसार समाजाची कुलस्वामिनी हिंगुलांबिका देवी मंदिरात हिंदु धर्म रुढी परंपरेने पहाटे पाच वाजता गाभा-यात दरवाजा उघडण्यात आला.

सोलापूर : संबळ आणि झांजच्या तालावर जमलेल्या भक्तगण, पुजारी, मानक-यांनी 'आई राजा उदो उदो'चा गजर करीत सोलापुरात ग्रामदेवी रुपाभवानीसह प्रमुख पाच देवींपुढे घटस्थापना झाली. याशिवाय काही प्रमुख मंडळांनी मंदिराच्या आवारात रविवारी पालखी मिरवणूक काढून देवी प्रतिष्ठापना केली.ग्रामदेवी रुपाभवानी मंदिरात पहाटे चार वाजता प्रक्षाळपूजा झाली. सकाळी ११.३० वाजता ट्रस्टी वहिवाटदार मल्लिनाथ मसरे आणि आमदार विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थित देवीची आरती करुन घटस्थापना करण्यात आली.

याबरोबरच गणेशपेठेतील भावसार समाजाची कुलस्वामिनी हिंगुलांबिका देवी मंदिरात हिंदु धर्म रुढी परंपरेने पहाटे पाच वाजता गाभा-यात दरवाजा उघडण्यात आला. सहा वाजेपर्यंत मंत्रपुष्पांजलीने अंबादास शामराव सुलाखे यांच्या हस्ते पंचामृत अभिषेक करण्यात आले. वस्त्र परिधान करून सुवर्ण अलंकार, पुष्पहार अर्पण करून भाविकांना दर्शनासाठी दरवाजा उघडला, सकाळी आकरा ते एक वाजेपर्यंत विविध धार्मिक विधीने मंदार रेळेकर यांच्या हस्ते परिवारासह जय हिंगलाज मातेच्या जय घोषात घटस्थापना करून आरती करण्यात आली.

रविवार पेठेतील इंद्रभवानी देवी मंदिरातही संबळ अन झांज पथकाच्या गजरात महाआरती करुन घटस्थापना करण्यात आली. पहिल्या दिवसी देवीला तुळजाभवानी देवीच्या रुपात सजवले गेले. यावेळी लक्ष्मण गायकवाड, नागनाथ गायकवाड, सुभाष गायकवाड, ब्रम्हदेव गायकवाड, इंद्रजित गायकवाड या प्रमुखांची उपस्थिती होती. तसेच शिवलाड तेली समाजाच्या अंबाबाई आणि जगदंबा या दोन देवीच्या गाभा-यात घटस्थापना झाली. अंबाबाई ट्रस्टच्या वतीने प्रवीणचंद्र उळागड्डे यांच्या हस्ते घटस्थापना झाली. याबरोबरच सायंकाळी चार वाजल्यानंतर देवी प्रतिष्ठापनेसाठी काही प्रमुख मंडळाच्या मिरवणुका वाजत-गाजत निघाल्या.

टॅग्स :Solapurसोलापूर