शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात घरफोड्या, दरोडे टाकणारी आंतरजिल्हा टोळीतील तिघे जेरबंद

By विलास जळकोटकर | Updated: October 20, 2023 19:07 IST

सव्वासहा लाखांचा मुद्देमाल जप्त : २ किलो चांदी, दोन दुचाकी, दोन चारचाकी एक पिस्टलचा समावेश

विलास जळकोटकर, सोलापूर : महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये दरोडा, जबरी चोरी, घरफोड्या घालून दहशत माजवणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील तिघांना एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून दोन किलो चांदी, एक पिस्टल, दोन दुचाकी, दोन चारचाकी असा ६ लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चार आणि जेलरोड हद्दीतील दोन असे एकूण सहा गुन्हे उघडकीस आणले. 

सोलापूर शहरात रात्रीच्या होणाऱ्या घरफोड्यांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तांनी पोलिसांना सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक प्रमूख विक्रम देशमुख यांना या गुन्ह्यांचे पाळेमुळे खणून काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ११ ऑक्टोबर रोजी पहाटे बालाजी ज्वेलर्स निलमनगर येथे चोरी केलेल्या टोळीतील राहूल रवींद्रसंग भोंड (रा. हडपसर, पुणे) व सुरज प्रकाश चव्हाण (रा. सुनील नगर, एमआयडीसी, सोलापूर) हे पोलीस कोठडीत आहेत. पोलिसांनी सुरज चव्हाण याच्याकडे घरफोडीच्या गुन्ह्याबद्दल कसन चौकशी केली असता त्याने चोरीतील अन्य दागिने प्रेम काशिनाथ कोळी याच्याकडे असल्याचे सांगितले. लागलीच फौजदार रजपूत यांनी सूत्र हलवली आणि त्यांनी प्रेम कोळी याला कलावती नगर, एमआयडीसी सोलापूर) येथून अटक केली.

अटक केलेल्या प्रेम कोळी याला पोलिसी खाक्या दाखवून चौकशी केली असता त्याने १४ ऑक्टोबर रोजी पहाटे दरोडा टाकण्याच्या उद्देशाने विणकर वसाहत येथून चोरलेली व कोंड्याल शाळेजवळ पार्क केलेली कार घेण्यासाठी प्रेम कोळी व त्याच्या दोन साथीदार तिलकसिंग टाक व हन्सराज उर्फ हन्सुसिंग रणजितसिंग टाक हे तिघे कार लावली होती तेथे गेले. तेथे या आरोपींनी फौजदार रजपूत यांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात रजपूत यांनी कार थांबवण्यासाठी टायरच्या दिशेने फायरिंग केली. त्यात सदर आरोपी पळून गेले होते.सहा गुन्हे उघडकीस

प्रेम कोळी याला अटक केल्यानंतर त्याने गुन्ह्यात पळून जाण्यासाठी वापरलेली स्वत:ची बाईक, ज्वेलर्सचे दुकानातील चोरलेली २ किलो चांदी, एक ग्रॅम सोने, पिस्टल, एक चॉपर, जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेली कार, एक दुचाकी जप्त करण्यात आली. असे एकूण दोन दुचाकी व दोन कार जप्त करण्यात आल्या. एकूण सहा गुन्हे उघडकीस आले.आंतरराज्य टोळीच्या मुसक्या आवळल्या

पोलिसांच्या अटकेत सध्या सुरज प्रकाश चव्हाण (हडपसर), प्रेम काशिनाथ कोळी, राहूल रवींद्रसिंग भोंड हे तिघे अटकेत आहेत. सूत्रधार असणारे तिलकसिंग टाक आणि हन्सराज टाक हे फरार आहेत. घरफोड्या, दरोडे, सराफ दुकाने फोडणे असे गंभीर गुन्हे या आरोपींविरुद्ध आहेत. महाराष्ट्राभर हैदोस माजवणाऱ्या या आंतरराज्य टोळीतील तिघांना अटक करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी