शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

कुर्डूवाडीत तरुणाचे मोबाईल टॉवरवर जाऊन चार तासांपासून अनोखे आंदोलन; नेमकं कारण काय?

By appasaheb.patil | Updated: August 15, 2024 19:03 IST

जिल्ह्यातील ठराविक महा ई सेवा केंद्र चालक स्वत:चा युजर आयडी इतर खाजगी दुकानात चालवण्यासाठी कमिशन बेसिसवर देत आहेत.

लक्ष्मण कांबळे

सोलापूर -  जिल्यातील काही महा ई सेवा केंद्र चालक स्वत:चा युजर आयडी इतर खाजगी दुकानात चालवण्यासाठी कमिशन बेसिसवर देत आहेत. काही ठिकाणी महिन्याचे भाडे ठरवून आयडी वापरण्यास दिलेले आहेत.एकच आयडी अनेक ठिकाणी वापरला जात असल्याने महा ई सेवा केंद्रांवर स्थानिक प्रशासनाचे नियंत्रण राहत नाही, त्यामुळे ग्रामीण भागातील महा ई सेवा केंद्र बंद पडत असल्याने संबंधितांवर कारवाई करण्यासाठी व्हिएलई वेल्फेअर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाघमारे यांनी अनोखे आंदोलन केले.  

जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करावी या मागणीसाठी कुर्डूवाडी येथील एका मोबाईल टॉवरवर सुमारे दोनशे फूट चढून स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी दुपारी तीन वाजल्यापासून आंदोलन सुरू केले असून तहसीलदार आंदोलन स्थळी पोहोचले असून खाली येण्याची विनवनी करीत आहेत. त्याला सायंकाळी सात वाजेपर्यंत आंदोलनकर्त्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने येथील स्थानिक प्रशासन टेंन्शनमध्ये आल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यातील ठराविक महा ई सेवा केंद्र चालक स्वत:चा युजर आयडी इतर खाजगी दुकानात चालवण्यासाठी कमिशन बेसिसवर देत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील महा ई सेवा केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र) चालकांवर याचा आर्थिक बाबतीत विपरीत परिणाम होऊन अनेक केंद्र बंद करावी लागली आहेत. दिवसेंदिवस ग्रामीण भागातील अधिकृत महा ई सेवा केंद्र बंद होत असल्याने केंद्र चालक बेरोजगार होत आहे. केंद्र बंद झाल्याने दुसऱ्याचा आयडी वापरणारांचे चांगले फावते आहे.पान टपरी, किराणा दुकान, जनरल स्टोअर्स, मोबाईल दुकान अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून महा ई सेवा केंद्रांचा आयडी वापरात असल्याने त्यांच्यावर कारवाई करणे शक्य होत नाही. आयडीचे भाडे किंवा कमिशन सोबतच स्वत:चा नफा यामुळे सेवेच्या किमती वाढून  जनतेची लुटमार होत असल्याचे आंदोलन करते आंदोलनकर्ते संतोष वाघमारे यांचे म्हणणे आहे.

१५ ऑगस्ट गुरुवारी दुपारी तीन वाजल्यापासून येथील मोबाईल टॉवरवर संतोष वाघमारे यांनी हे आंदोलन सुरू केले आहे. तेव्हापासून तहसीलदार विनोद रणवरे हे आपल्या काही अधिकाऱ्यांसह आंदोलन स्थळावर पोहोचले असून ते हा विषय वरिष्ठ पातळीवरील असून आपण याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक लावू असे आश्वासन देत असताना देखील आंदोलन कर्त्याकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही. त्यामुळे पोलीस प्रशासन,तहसील विभाग तणावग्रस्त बनले आहे या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे नागरिकांनी हे आंदोलन पाहण्यासाठी एकच गर्दी केल्याचे दिसून येत आहे.