शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मुदतवाढ अशक्य; राज्यातील १२ हजार ग्रामपंचायतींवर येणार प्रशासक...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 11:55 IST

ग्रामविकास मंत्री : सरपंच, सदस्यांच्या मुदतवाढीसंदर्भात सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी साधला संवाद

ठळक मुद्देग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली असता कायद्याच्या बंधनामुळे ग्रामपंचायत सदस्यांना मुदतवाढ देणे अशक्यघटनेत बदल करून ज्या त्या वेळी निवडणूक घेणे शक्य नसल्यास प्रशासक नेमावेत, असा कायदा झालामुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमल्याशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट

कुर्डूवाडी : राज्यातील मुदत संपणाºया जवळपास १२ हजारांपेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त होणार असल्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी १५ मे रोजी स्पष्ट केले आहे. अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने मुख्यमंत्र्यांसह ग्रामविकास मंत्र्यांना पत्राद्वारे मुदतवाढीची मागणी सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील केली होती. त्यावर ग्रामविकास मंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले.

कोरोना विरोधातील लढ्यात योगदान देऊन सरपंच व सदस्यांनी ग्रामीण महाराष्ट्र सुरक्षित ठेवला़ गावोगावी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत व कर्मचाºयांना घेऊन गावात फवारणी करणे, शिवाय गोरगरिबांना किराणा माल, अन्नधान्य, सॅनिटायझर, मास्क वाटप, बाहेरगावातून आलेल्यांची आरोग्य तपासणी करून विलगीकरण करणे अशी कामे करीत आहेत.

आता तर शहरातील लोक आपल्या मूळगावी येत असल्याने सरपंच व सदस्यांची गरज असताना प्रशासक लागणार म्हणजे ही लढाई सोडून द्यावी लागेल़ अशा परिस्थितीत मुदतवाढ नाही दिली तर २२ मे रोजी सरपंच, उपसरपंच आपापल्या ग्रामपंचायतीमध्ये एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण, इतकेच नव्हे तर १ जूनपासून आपापल्या तालुक्यातील पंचायत समितीसमोर साखळी उपोषणाला बसणार आहेत, असे निवेदन मुख्यमंत्र्यांसह ग्रामविकास मंत्र्यांना पाठविले होते़ त्यानंतर जयंत पाटील यांनी ग्रामविकास मंत्र्यांशी फोनवरून संवाद साधला़ ग्रामविकास मंत्र्यांनी मुदवाढ देण्यास असमर्थता दर्शवल्यामुळे आंदोलन मागे घेत असल्याचे पाटील यांनी सांगितले. 

कायद्यात बदल झाल्याने मुदतवाढ अशक्य- ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली असता कायद्याच्या बंधनामुळे ग्रामपंचायत सदस्यांना मुदतवाढ देणे अशक्य वाटत असल्याचे सांगितले़ पूर्वी राजकीय सोयीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जायच्या़ मात्र आता घटनेत बदल करून ज्या त्या वेळी निवडणूक घेणे शक्य नसल्यास प्रशासक नेमावेत, असा कायदा झाला़ मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमल्याशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट केले. याबाबत राज्यपालांमार्फत अध्यादेश काढून सरपंचांना दिलासा द्यावा, अशी विनंती केली असता ग्रामविकास मंत्र्यांनी तशीसुद्धा कायद्यात तरतूद ठेवलेली नसल्याचे सांगितले. आमची इच्छा असूनही निर्णय घेता येत नाही असेही ग्रामविकासमंत्री म्हणाले. 

कायदेशीर मुदत संपणाºया प्रकरणातही मुदतीतून लॉकडाऊनचा कालावधी वगळला असून जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक ही विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कालावधी वाढविला होता़ त्यामुळे सरपंच व सदस्यांचा कालावधी सहा महिने वाढविण्यासाठी कायदेशीर अडचण नाही. सध्या प्रशासक नेमण्यास अडचणीचे ठरेल, त्यासाठी शासनाने याचा गांभीर्यपूर्वक विचार करावा.- अ‍ॅड. विकास जाधव, प्रदेश सरचिटणीस, राज्य सरपंच परिषद 

टॅग्स :Solapurसोलापूरgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकHasan Mushrifहसन मुश्रीफ