शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
3
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
4
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
5
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
6
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
7
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
8
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
9
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
10
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
11
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
12
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
13
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
14
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
15
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
16
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
17
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
18
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
19
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
20
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रीतून अशक्य गोष्ट साध्य...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 10:58 IST

मैत्रीचं  हे अनोखं नातं असतं...

मैत्रीचं  हे अनोखं नातं असतं... त्याची प्रचिती आपणास वेळोवेळी येते. काहीवेळा हे नातं रक्ताच्या नात्याइतकंच किंबहुना थोडं जास्तच दृढ असतं़ याचा अनुभव मला अनेक वेळा आला़ रक्ताची नाती ही आपणांस निवडता येत नाहीत, पण चांगले मित्र आपण निवडू शकतो. माझ्या शैक्षणिक वाटचालीत तसेच सामाजिक संस्थेमध्ये काम करताना चांगले मित्र मिळाले. असं म्हणतात, ‘संकटसमयी मदत करणाराच खरा मित्र’. मैत्रीच्या गोष्टीचा अनुभव मला अनेकवेळा आला़ पण पैकी दोनच अनुभव इथं मांडत आहे.

पहिला अनुभव : काही वर्षांपूर्वी उत्तराखंडमध्ये ढगफुटी झाली़ यात मनुष्यहानी, निसर्गाचे नुकसान झाले़ ही बातमी टीव्हीवर पाहत असतानाच माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला, तू नेहमी सांगत असतो की, मैत्रीचं जाळं दूरवर पसरलंय़ मला एका गोष्टीसाठी मदत करशील का? मी तिला विचारलं, काय मदत हवी आहे. तिने सांगितले की, तिच्या कंपनीत काम करणाºया एका अधिकाºयाचे आई-वडील उत्तराखंडातील या नैसर्गिक आपत्तीवेळी केदारनाथ या मंदिरात आहेत आणि त्यांचा ठावठिकाणा लागत नाही़ संपर्कही होत नाही. मनात विचार आला की, माझ्या संपर्कावर मित्रांचा किती विश्वास आहे़ मी प्रत्युत्तर दिलं, प्रयत्न करतो अन् विनंती केली त्या दोन्ही व्यक्तींची नावे, त्यांचा मोबाईल नंबर मेसेज कर. मी उत्तराखंडातील रोटरी गव्हर्नर मित्र कर्नल दिलीप पटनाईक याला फोन केला. त्याला मी सर्व परिस्थिती सांगितली़ त्याने मला सांगितले की, उत्तराखंडातील या नैसर्गिक आपत्तीमध्ये अडकलेल्या सर्व नागरिकांना योग्य स्थळी पाठवण्यासाठी विमानतळाचा प्रमुख अधिकारी म्हणून काम पाहत आहे. तो मेसेज वाचून मला त्या अधिकाºयाच्या आई-वडिलांचा ठावठिकाणा लागल्यास मला कळवेल. अगदी काही तासातच त्याचा फोन आला़ त्यांनी सांगितलं तू चौकशी करीत असलेल्या अधिकाºयाचे आई-वडील सुखरूप आहेत आणि त्यांना नजीकच्या विमानतळावर पाठवून दिले आहे. मला हे ऐकून आनंद तर झालाच, पण एक मित्र माझ्या मित्रांसाठी नैसर्गिक आपत्तीत अशक्य अशा मदतीला धावून येतोय, याचा अभिमान वाटला. लगेच मी मैत्रिणीला फोन करून ही गोड बातमी सांगितली.

दुसरा अनुभव : मी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची तपासणी करताना एक मित्र भेटायला आला. त्याच्या चेहºयावर प्रचंड ताण होता. मी त्याला काय झाले, असे विचारल्यानंतर आज मला तातडीची एक मदत हवी आहे, असे तो म्हणाला. बहीण, भाऊजी हे वैष्णोदेवी मंदिरास भेट देण्यासाठी गेले आहेत़ वैष्णोदेवी मंदिरास जाताना पर्वत चढताना भाऊजींच्या छातीत वेदना अन् कळा येण्यास सुरुवात झाली. त्यांना तातडीने जम्मू येथील एका हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केले़ त्याची बहीण ही घाबरलेली असून, तिथे कोणीही परिचयाचे नाही. आम्हास चिंता लागली आहे, तेथील परिस्थिती अन् भाऊजींची प्रकृती कशी आहे? त्याने विनंती केली की, परिचयाचे कोणी मित्र तेथे असतील तर मदत मिळावी.

जम्मूतील उधमपूर येथे मी रोटरीच्या माध्यमातून ५ दिवस मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी गेलो होतो. दरम्यान, माझी दोन व्यक्तींबरोबर मैत्री झालेली़ मी या दोन्ही व्यक्तींना फोन करून सर्व परिस्थिती सांगितली. त्यांनीही त्यांचा मोबाईल नंबर मेसेज करण्यास सांगितले. अगदी २० मिनिटांनीच जम्मूतील मित्राचा फोन आला की, काही वेळातच तेथील विभागीय रोटरी सहा़ प्रांतपाल आणि रोटेरियन हे हॉस्पिटलमध्ये पोहोचतील. पाच मिनिटांत मला तेथील सहा़ प्रांतपाल यांचा फोन आला़ ते मित्राच्या भाऊजींजवळ उभे असून, रुग्णांवर उपचार करणारा डॉक्टरसुद्धा रोटेरियन आहे आणि त्याच्याशी बोला, असे म्हणाले. मी त्या डॉक्टरांकडून सर्व माहिती विचारून घेतली. मित्राच्या भाऊजींना हलकासा हार्ट अटॅक आला असून, त्यांच्यावर योग्य उपचार चालू आहेत आणि पुढील उपचारासंदर्भात ते माझ्या संपर्कात राहतील. मी या गोष्टी मित्राला सांगण्यापूर्वी त्यांना बहिणीचा फोन येऊन गेला होता. त्याने आणि त्याच्या कुटुंबाने धन्यवाद मानले. - डॉ. व्यंकटेश मेतन(लेखक अस्थिरोगतज्ज्ञ आहेत)

टॅग्स :Solapurसोलापूरdocterडॉक्टरFriendship Dayफ्रेंडशिप डे