शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या संरक्षणाखाली अवैध डान्सबार सुरू; सुभाष देशमुखांचा खळबळजनक आरोप

By आप्पासाहेब पाटील | Updated: February 24, 2026 20:14 IST

तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणीही त्यांनी केली.

आप्पासाहेब पाटील, सोलापूर : सोलापूर शहरात काही ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या संरक्षणाखाली अवैधरित्या डान्सबार सुरू असल्याचा खळबळजनक आरोप आमदार सुभाष देशमुख यांनी विधानसभेत केला. या डान्सबारमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत असून सामाजिक वातावरण बिघडण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सभागृहात नमूद केले. तसेच तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणीही त्यांनी केली.

देशमुख म्हणाले की, सोलापूर शहरासह विशेषतः दक्षिण तालुक्यातील काही ग्रामीण भागांत अवैधरित्या डान्सबार सुरू आहेत. यासंदर्भातील व्हिडिओ क्लिप त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयाकडे दिल्याची माहितीही त्यांनी सभागृहात दिली. संबंधित क्लिपनंतर काही पोलीस अधिकाऱ्यांनी डान्सबारमध्ये जाऊन पाहणी केली. मात्र अधिकारी बाहेर येताना दिसत असले तरी संबंधित डान्सबारवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप त्यांनी केला.

यामुळे हे डान्सबार पोलिसांच्या संरक्षणाखालीच सुरू असल्याचा संशय निर्माण होत असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. अशा प्रकारांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली. दरम्यान, गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्ट भूमिका सभागृहात मांडली. त्यामुळे सोलापूरकरांचे लक्ष आता प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Illegal dance bars thrive under police protection, alleges Subhash Deshmukh.

Web Summary : MLA Subhash Deshmukh alleges illegal dance bars operate in Solapur with police protection, creating law and order issues. He demanded immediate action, prompting a government inquiry.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी