शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

बेकायदेशीर चिमणी पाडा, सोलापूर पालिकेचे पत्र पुन्हा सिध्देश्वर कारखान्यावर धडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2021 15:01 IST

बेकायदेशी चिमणी प्रकरण : पुन्हा दिली सात दिवसांची मुदत

साेलापूर : विमानसेवेस अडथळा ठरणारी बेकायदेशीर चिमणी सात दिवसांच्या आत पाडून टाका, अन्यथा महापालिकेचे मक्तेदार पाडकाम हाती घेतील, असे पत्र महापालिकेच्या नगररचना कार्यालयाचे साहाय्यक संचालक माेरेश्वर सुगडे यांनी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी यांना बुधवारी पाठविले. यापूर्वीही पालिकेने तीन वेळा अशी पत्रे दिली हाेती.

महापालिकेने सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची बेकायदेशीर चिमणी पाडण्यासाठी मक्तेदार नेमला आहे. यादरम्यान, कारखान्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली हाेती. त्यानुसार नगरविकास खात्याने विधी व न्याय विभागाचा अहवाल येईपर्यंत कारवाई स्थगित ठेवा, असे कळविले हाेते. नगरविकास खात्याने मंगळवारी ही स्थगिती उठविली. पालिकेने त्वरित पाडकामाची कारवाई करावी, असे सांगितले. त्यानुसार नगररचना कार्यालयाने बुधवारी कारखान्याला पत्र पाठविले. बुधवार, २४ नाेव्हेंबरपर्यंत पाडकाम करावे, अन्यथा पालिकेचे मक्तेदार पाडकाम हाती घेतील. पाडकामाचा खर्च आणि त्यावरील सुपरव्हिजन खर्चही कारखान्याला द्यावा लागेल, असे नगररचना प्रमुख सुगडे यांनी कळविले आहे.

--

सात दिवसांच्या मुदतीचे तिसरे पत्र

पालिकेने यापूर्वी २०१६ मध्ये कारवाई हाती घेतली. प्रथम सात दिवसांच्या मुदतीचे पत्र पाठविले. नंतर कारवाई सुरू केली. शेतकऱ्यांचा विराेध आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर कारवाई थांबली. २०१९ मध्ये पालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून चिमणी हटविण्याचे पत्र देण्यात आले. कारखान्याने न्यायालयातून स्थगिती मिळविली. आता नाेव्हेंबर २०२१ मध्ये पुन्हा सात दिवसांच्या आत चिमणी पाडा म्हणून पत्र पाठविले आहे. सात दिवसांच्या मुदतीचे हे तिसरे पत्र आहे.

----

चार टाॅवरवर यापूर्वीच कारवाई

हाेटगी राेड विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यास सिद्धेश्वरच्या चिमणीसह चार माेबाइल टाॅवर आणि काही इमारतींचा समावेश हाेता. चारही टाॅवरची उंची कमी करण्यात आली. बांधकामांची उंची कमी करण्यात आल्याचे पालिकेचे साहाय्यक अभियंता शांताराम आवताडे यांनी ‘लाेकमत’ला सांगितले.

---

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका