शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

भूखंड वाटपाच्या बनावट फायलीव्दारे हजारो एकर शासकीय जमीनीचे बेकायदेशीर वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2021 17:14 IST

सोलापूर जिल्हा पुनर्वसन अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्याविरुद्ध किरीट सोमय्याकडे तक्रार 

मंगळवेढा : मंगळवेढा शहरालगतचे भूखंड बेकायदेशीर रित्या वाटप करण्या बरोबर  जिल्हा पुनवर्सन अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी जुने आदेश दाखवून व  बनावट आदेश तयार करत जमीन व भूखंड वाटपाच्या  बनावट फायलीव्दारे हजारो एकर शासकीय जमीनीचे वाटप करण्यात आले आहे. चव्हाण यांच्या आजपर्यंतच्या सर्व कामाची चौकशी होवून कारवाई करण्याची मागणी अखिल महाराष्ट्र हटकर समाज संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग चौगुले यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व माजी खासदार किरीट सोमय्या यांना निवेदनाद्वारे केली आहे.

 जिल्हा पुनवर्सन अधिकारी मोहिनी चव्हाण या सोलापूर येथे आल्यापासून ते आजतागायत शासकीय नियम पायदळी तुडवून बेकायदेशीररित्या जमीनीचे भूखंडाचे वाटप केले आहे. यासंदर्भात यापूर्वी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे तक्रार अर्ज देवून देखील अद्यापही कार्यवाही करण्यात आली नाही. जुने आदेश दाखवून व  बनावट आदेश तयार करत जमीन व भूखंड वाटपाच्या  बनावट फायलीव्दारे हजारो एकर शासकीय जमिनीचे वाटप केले. यात तक्रारीनंतर वाटप केलेले बरेचसे क्षेत्र रदद केले. फसवणूक झालेल्या अनेकांनी याबाबत न्यायालयात चव्हाण यांच्याविरोधात याचिका दाखल केल्या. मंगळवेढा शहरालगतचे भूखंड बेकायदेशीररित्या वाटप केले. देवडे ता पंढरपूर येथील भूखंड उजनी प्रकल्पग्रस्ताला राखीव असताना कोयना खातेदाराला शासकीय नियम डावलून बेकायदेशिरित्या वाटप केले.

याच जमीनीचे न्यायालयीन वाद विशेषता स्थगीती आदेश असताना जमीन खरेदी विक्री करणाग्रा एजंटाला हाताशी धरून जमिनीचे वाटप केले. या प्रकरणात जिल्हा पुनवर्सन अधिकारी यांच्यासह कार्यालयातील कर्मचायांनी संगणमतानी मोठ्या आर्थीक उलाढालीतून शासनाची फसवणूक करत मोठे नुकसान केले आहे. या सर्व बाबाची चौकशी स्वतंत्र समिती नेमून १ जानेवारी २०१५ पासून ते २० सप्टेबर २००१ पर्यंतच्या पुनर्वसन जमीन वाटपाच्या कामाची येत्या २० दिवसाच्या आत करावी, चौकशीत दोषी आढळणाऱ्या सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई  करावी, बेकायदेशीर कामे करणाऱ्या जिल्हा पुनर्वसन अधिकारी चव्हाण यांच्यवर कारवाई न झाल्यास  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २० आॅक्टोबर रोजी संघटनेच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा  निवेदनात दिला आहे .......................................सर्व कायदेशीर बाबी तपासून जमिनीचे  वाटप करण्यात आले आहे.तसेच जिल्हा पुनवर्सन अधिकारी पदावरून  माझी सध्या  बदली झाली आहे - मोहिनी चव्हाण, तत्कालीन जिल्हा पुनर्वसन अधिकारी, सोलापूर

 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय