शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
3
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
4
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
5
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
7
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
8
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
9
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
10
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
11
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
12
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
13
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
14
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
15
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
16
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
17
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
18
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
19
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
20
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?

तिरुपतीला जायचंय तर ४ महिन्यांपूर्वीच करा आॅनलाईन बुकिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 12:16 IST

तिरुपती दर्शन अन् रुम्स् बुकिंगसाठी पहाटे सहापासून सोलापूरकरांची गर्दी

ठळक मुद्देस्पेशल दर्शन तिकिटाचे दर तीनशे रुपये असून भक्तनिवासातील साध्या रुमकरिता शंभर रुपये सेवा तिकिटाचे दर दोनशे तसेच तीनशे रुपये इतके आहेत भक्तनिवास कोटा संपला असून दर्शन आणि सेवा बुकिंग सुरु

सोलापूर : उन्हाळा सुट्टीत तिरुपतीला जाण्याचे प्रमाण अधिक असते़ सुट्टी काळात तिरुपती दर्शन घेणाºयांनी आतापासूनच स्पेशल दर्शन, भक्तनिवास तसेच पूजा सेवेकरिता आॅनलाईन बुकिंग करायला सुरुवात केली आहे़ एप्रिल महिन्यात तिरुपतीला जाणाºयांनी येथील टीडीपी बुकिंग काऊंटरवर आतापासूनच गर्दी करताहेत़ दाजी पेठेतील बालाजी देवस्थानात पहाटे सहापासून भक्तगण रांगा लावताहेत.

एप्रिल, मे आणि जूनच्या नियोजित बालाजी दर्शन यात्रा करणाºया भक्तांची टीडीपी काऊंटर समोर रेलचेल वाढली आहे़ विशेष म्हणजे, एप्रिलमधील भक्तनिवास बुकिंग हाऊसफुल्ल झाले आहे़ स्पेशल दर्शनचे बुकिंग सुरु असून तेही लवकरच हाऊसफुल्ल होण्याची शक्यता आहे, अशी माहिती टीडीपी काऊंटरचे आॅपरेटर सिद्राम उपलंची यांनी लोकमतला दिली़ दाजीपेठेतील बालाजी देवस्थानात तिरुमला तिरुपती देवस्थान अर्थात टीडीपीचे अधिकृत आॅनलाईन बुकिंग काऊंटर आहे़ येथून तिरुपती येथील भक्तनिवास, स्पेशल दर्शन तसेच वसंतोत्सव, दीपोत्सव तसेच अर्जित ब्रह्मोत्सव अशा पूजा सेवा बुकिंग आॅनलाईन करता येतात़ २१ मे २००८ पासून सोलापुरात टीडीपी दर्शन काऊंटर सुरु आहे़ प्रतिवर्षी एक लाखाहून अधिक भाविक आॅनलाईन बुकिंग सेवेचा लाभ घेतात, असेही उपलंची यांनी सांगितले़ महाराष्ट्रात केवल तीनच काऊंटर आहेत़ महाराष्ट्रात लातूर, शिर्डी, नागपूर, अमरावती, मुंबई, पुणे तसेच सोलापूर अशा सात ठिकाणी टीडीपीचे काऊंटर सुरु आहेत.

दाजीपेठेतील काऊंटर सकाळी ११ वाजता सुरु होतो़ देशभरातील भक्तगण आॅनलाईनवर बुकिंगकरिता गर्दी करत असल्याने काही तासात बुकिंग प्रक्रिया संपते़ अनेकदा आॅनलाईन शेड्यूलही हॅक होऊन जाते़ त्यामुळे, भक्तगण पहाटे सहापासूनच काऊंटरसमोर रांगा लावताहेत़ ४ महिन्यानंतरचा बुकिंग कोटा प्रति महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खुला होतो़  दर एक तारखेला पुढील चार महिन्यानंतरचा शेड्यूल जाहीर होत असल्याने भक्तगण चार महिन्यानंतरचे नियोजन आतापासून करतात़ एप्रिल महिन्यातील भक्तनिवास कोटा ७ जानेवारीलाच संपल्याची माहिती सिद्राम उपलंची यांनी दिली़ तर दर्शन आणि सेवा बुकिंग सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले़

एप्रिल महिन्याचे नियोजन- अधिक माहिती देताना सिद्राम उपलंची यांनी सांगितले, स्पेशल दर्शन तिकिटाचे दर तीनशे रुपये असून भक्तनिवासातील साध्या रुमकरिता शंभर रुपये आणि स्पेशल रुमकरिता एक हजार रुपये असे दर आहेत़ तसेच सेवा तिकिटाचे दर दोनशे तसेच तीनशे रुपये इतके आहेत़ एप्रिल महिन्यात जाणाºया चौदाशे भक्तांनी ७ जानेवारी रोजी भक्तनिवास आणि स्पेशल दर्शनाकरिता बुकिंग केले़ ७ जानेवारी रोजी भक्तगण पहाटे सहा वाजेपासून काऊंटरवर गर्दी केली़ भक्तनिवास कोटा संपला असून दर्शन आणि सेवा बुकिंग सुरु आहे़ मे महिन्याचा कोटा एक फेब्रुवारीला जाहीर होणार आहे़ आनलाईन कोटा लवकरच संपतो़ त्यामुळे अनेकांना त्यांच्या इच्छेनुसार बुकिंग मिळत नाही़ अनेकांना माघारी फिरावे लागत आहे़ तर काहींचे शेड्यूल महिनाभराने पुढे चालले आहे़

टॅग्स :Solapurसोलापूरtirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाट