शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

दाराची किंवा गाडीची चावी हरवली? आता 'ओळखपत्र' आणा अन् मिळवा दुसरी किल्ली 

By काशिनाथ वाघमारे | Updated: April 16, 2023 17:34 IST

सोलापुरात घराची अथवा गाडीची चावी हरवल्यास ओळखपत्र दाखवल्याशिवाय डुप्लीकेट चावी मिळणार नाही. 

सोलापूर: बाहेर गेलात अन दाराची चावी हरवली, आत राहिलात अन लॅच लॉक लागलं, गाडीची चावी हरवली... मग काय करणार? की मेकर वाल्याकडे जाणार असाल तर तो तुमच्या ओळखपत्राशिवाय आणि खात्री केल्याशिवाय डुप्लीकेट चावी बनवून देणारच नाही. आता ओळखपत्र आणि वाहनांची कागदपत्रे पाहूनच दुसरी चावी देण्याची नियमावली कुलूप व्यवसायिकांनी पुढे आणली आहे.

सोलापूर शहरात लाखो घरं असून पोलिसांचे बळ सुरक्षेच्या बाबतीत कमी पडते. त्यामुळे सोलापूरकारांना स्वत:च्या घराची काळजी स्वत:ला जेवढी अधिक घेता येईल तेवढी स्वत:च्या संपत्तीची सुरक्षितता राहणार आहे. पोलिसांची गस्त असतानादेखील घरं फोडली जातात, चाेरटे घरासमाेरुन दुचाकी पळवतात. अशावेळी बनावट चाव्या बनवून घरं फोडल्याची काही उदाहरणं पुढे येत असल्याने व्यवसायात पारदर्शी असलेल्या की मेकर वाल्यांनी आता ओळखपत्र आणि कागपदत्रे पाहूनच दुसरी चावी बनवून देताहेत. विश्वाससाहर्ता वाढवत आहेत. अपार्टमेंटमध्ये ओळख सांगत आले घर फोडून सुरक्षा रक्षकासमोरुन गेलेकाही दिवसांपूर्वी भैय्या चौक ते देगाव दरम्यान एका अपार्टमेंटमधील एक कुटूंब घर बंद करुन बाहेर गावी गेले. त्याच्या दुस-या दिवसी काही तरुण आले. सुरक्षा रक्षक हटकताच बाहेर गावी गेलेले लोक नातेवाईक असून त्यांनी आम्हाला घरी पाठवल्याचे सांगून आत गेले. 'मास्टर की' वापरुन घर उघडले अन सारा ऐवज घेऊन सुरक्षा रक्षकांकासमोरुन पोबारा केला. त्यानंतर चोरट्यांनी सुरक्षा रक्षकालाही गंडवल्याचा प्रकार पुढे येताच 'की' मेकर वाले सतर्क झाले अन नियमावली कडक केली.

बरेच अनोळखी लोक चावी हरवल्यानंतर दुचाकी ढकलत घेऊन येतात. त्या गाड्या त्यांच्याच आहेत का ? हे विचारणे देखील अवघड असते. परंतू पोलिसांच्या सूचनानंतर आता दुचाकी धारकाचे आधार कार्ड आणि कागदपत्रे पाहूनच दुसरी चावी बनवून देतो. ओळख पटल्याशिवाय चावी बनवत नाही. - अखलाख टंगसाल, चावी मेकर

 

टॅग्स :Solapurसोलापूर