शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

ठरलं तर, सोलापूर जिल्ह्यात मंगळवारी सरपंच, उपसरपंच निवडीचा गुलाल....!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 19:07 IST

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले आदेश

सोलापूर -  सोलापूर जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधील सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडीला अखेर  मुहूर्त मिळाला आहे.  सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडी संबंधी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले आदेश काढले आहेत. 23 फेब्रुवारीला सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी शंभरकर यांनी जाहीर केला आहे. 

सरपंच पद आरक्षणावर आक्षेप घेतलेल्या आठ तालुक्यातील २२ हरकतींवर जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घेतली. सुनावणीदरम्यान या तालुक्यातील सरपंच, उपसरपंच निवड कार्यक्रमाला स्थगिती दिली होती. ८ पैकी ४ तालुक्यातील हरकती फेटाळल्या.स्थगिती मागे घेत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी  ४ तालुक्यात मंगळवार २३ फेब्रुवारी रोजी सरपंच, उपसरपंच निवड कार्यक्रम राबवण्याचे आदेश दिलेत.

यामुळे ४ तालुक्यातील अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकला. आता मंगळवारी सरपंच, उपसरपंच निवडीचा गुलाल उधळणार असल्याने याची उत्सुकता ग्रामीण भागात लागून राहिली आहे. माढा, दक्षिण सोलापूर, मोहोळ, माळशिरस या चार  तालुक्यात मंगळवारी २३ फेब्रुवारी सरपंच, उपसरपंच निवडीचा गुलाल उधळणार आहेत. ३ दिवस अगोदर संबंधित गावांना तहसीलदारांनी नोटीस पाठवावेत. त्याच दिवशी सभा बोलावून निवड कार्यक्रम राबवा, असे आदेशात म्हटले आहे.

अक्कलकोट, सांगोला, बार्शी आणि पंढरपूर या तालुक्यातील हरकतींचे काय झाले?. अशी विचारणा संबंधित तालुक्यातून होत आहे. त्यामुळे या चार तालुका बाबत जिल्हाधिकारी काय निर्णय घेतील, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहेत.

 

टॅग्स :Solapurसोलापूरgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकPoliticsराजकारणSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय