शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवाराचा खर्च मर्यादेबाहेर गेला तर निवडून आलेले पद होईल रद्द 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 12:15 IST

लोकसभा निवडणुकीचे खर्च निरीक्षक आणि सोलापूर महापालिकेचे उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे-पाटील यांची माहिती 

ठळक मुद्देदररोज खर्चाचा हिशोब सादर करणे बंधनकारक, विधानसभानिहाय पथके नियुक्तखर्च आणि स्विप म्हणजे मतदार जागृती करण्यासाठी असे तीन निरीक्षक कार्यरत उमेदवाराच्या खर्चाबाबत निवडणूक निरीक्षक म्हणून अभय गुप्ता यांच्याकडे जबाबदारी

राजकुमार सारोळे

सोलापूर :  सोलापूरलोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या खर्चाचा हिशोब घेण्याबाबत निरीक्षक म्हणून माझी नियुक्ती आहे. उमेदवारांना दररोज खर्चाचा हिशोब सादर करणे बंधनकारक आहे. त्यांनी सादर केलेल्या खर्चात तफावत आहे का हे तपासण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय पथके नियुक्त करण्यात आली आहेत. उमेदवाराचा खर्च मर्यादेबाहेर गेल्यास निवडून आलेले पद रद्द होण्याचा धोका असतो, अशी माहिती  लोकसभा निवडणुकीचे खर्च निरीक्षक आणि सोलापूर महापालिकेचे उपायुक्त त्रिेंबक ढेंगळे -पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

प्रश्न : खर्चाविषयी उमेदवारावर काय बंधने आहेत?उत्तर : लोकसभा उमेदवारासाठी खर्च मर्यादा ७० लाख आहे. त्यापेक्षा जादा खर्च झाल्यास निवडून आलेल्या उमेदवाराचे पद रद्द होऊ शकते. उमेदवाराने दररोजच्या खर्चाचा तपशील दुसºया दिवशी निवडणूक कार्यालयास सादर करणे बंधनकारक आहे. असे न झाल्यास कार्यालयातर्फे उमेदवाराला नोटीस दिली जाते. 

प्रश्न : उमेदवाराच्या खर्चाचा हिशोब कसा काढला जातो ? उत्तर : प्रत्येक उमेदवाराच्या मागे व्हिडीओ पथक कार्यरत असते. बैठका, सभा, रॅलीमध्ये कोणत्या बाबींचा वापर झाला त्यावरून खर्च काढला जातो. उदा. बॅनर, पोस्टर, टोप्या, झेंडे यांचा वापर किती झाला हे पाहून खर्च तपासला जातो. याशिवाय उमेदवाराने सभा, रॅली काढण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या घेतल्या का. त्या परवान्याचे शुल्क, याशिवाय लोकांनी केलेल्या तक्रारीवरून खातरजमा करून तो खर्च उमेदवाराच्या हिशोबात खर्ची टाकतात.

आयोगाकडे गोपनीय रिपोर्टउमेदवाराच्या खर्चाबाबत निवडणूक निरीक्षक म्हणून अभय गुप्ता यांच्याकडे जबाबदारी आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार तीन टप्प्यात खर्चाची तपासणी केली जाते. निरीक्षक अचानकपणे भेट देऊन पाहणी करतात. प्रत्येक मतदारसंघात अशा तीन भेटी असतात, याबाबत पाच अहवाल निवडणूक आयोगाकडे गोपनीयपणे सादर केले जातात अशी माहिती खर्च निरीक्षक  तथा महापालिकेचे उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

तीन निरीक्षक आहेत कार्यरतलोकसभा निवडणुकीसाठी सर्वसाधारण, खर्च आणि स्विप म्हणजे मतदार जागृती करण्यासाठी असे तीन निरीक्षक कार्यरत आहेत. याचबरोबर निवडणुकीवर परिणाम करणाºया पैसे, दारू, साहित्य वाटपावर लक्ष ठेवले जाते. यासाठी व्हिजीलन्स पथके तयार आहेत. या पथकास बंदूकधारी पोलिसांचा बंदोबस्त असून, अचानकपणे वाहन तपासणी केली जाते. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूकlok sabhaलोकसभा