शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

खोदकाम करताना सापडली शिवकालीन महादेवाची मूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 10:42 IST

सांगोल्यातील घटना; शिवस्मारकाच्या कामासाठी दानशुरांचे हात येणार पुढे

ठळक मुद्देसांगोला नगरपरिषदेकडून या नियोजित शिवस्मारकासाठी १७ लाख रुपये मंजूरशिवस्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी साधारण ७० ते ७५ लाख रुपये खर्च येणारउर्वरित खर्च शिवप्रेमी मंडळातर्फे दानशूर व्यक्तींच्या मदतीने करण्यात येणार

सांगोला : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ शिवस्मारकाचे खोदकाम करीत असताना कोरीव शिवकालीन महादेवाची मूर्ती सापडली आहे. दरम्यान, शिवलिंगाची मूर्ती पाण्याने स्वच्छ करून त्याची पूजा करण्यात आली.  शिवस्मारकराचे हे काम लवकरच पूर्ण होणार असून त्यासाठी दानशुरांचेही हात पुढे येत असल्याचे सांगण्यात आले.

सांगोला नगरपरिषद व शिवप्रेमी मंडळाच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यासाठी युध्दपातळीवर काम सुरू आहे. शिवस्मारकासाठी खोदकाम सुरू असताना ८ फेब्रुवारी रोजी कोरीव मूर्ती सापडली. ही मूर्ती शिवकालीन असून, दीड फूट रुंद व दोन फूट उंचीची आहे. या मूर्तीवर छत्रपती शिवाजी महाराज शिवलिंगाची पूजा करीत असल्याचे दिसून येते. या सांगोला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येन उपस्थित होते.

 यावेळी बापूसाहेब भाकरे, सोमेश यावलकर, भारत साळुंखे, सुशील अंकलगी, अभिजित मार्डे, बाळासाहेब शिंदे, बापूसाहेब भाकरे, रमेश जाधव, बिले, गोपाळ चोथे, आनंद घोंगडे, मनोज उकळे, राजू चांडोले, शैलेश घोंगडे, सज्जाद तांबोळी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

शिवस्मारकासाठी १७ लाखांचा निधी - दरम्यान, सांगोला नगरपरिषदेकडून या नियोजित शिवस्मारकासाठी १७ लाख रुपये मंजूर झाले आहेत़ तसेच शिवस्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी साधारण ७० ते ७५ लाख रुपये खर्च येणार आहेत़ नगरपरिषदेकडील मंजूर निधी वजा होता उर्वरित खर्च शिवप्रेमी मंडळातर्फे दानशूर व्यक्तींच्या मदतीने करण्यात येणार आहे. लवकरच हे स्मारक पूर्ण होणार असल्याचा विश्वास अरविंद केदार यांनी दिला आहे. 

त्याच ठिकाणी प्रतिष्ठापना करावी- ज्येष्ठ इतिहासकार प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांच्या मते शिवस्मारकाच्या खोदकामात शिवलिंगाची मूर्ती सापडणे हा एक शुभसंकेत आहे़ ज्या ठिकाणी सापडली त्याच ठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना करावी, असे त्यांनी सुचविले आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजhistoryइतिहास