शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

मी राष्ट्रवादीतच हे मोहिते-पाटील यांचे वक्तव्य सत्तेसाठीच: जानकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 12:22 IST

लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून ते विधानसभा निवडणुका होईपर्यंत विजयसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपचेच काम केले

ठळक मुद्दे झेडपीत सत्ता स्थापनेबाबत महाविकास आघाडीची आज बैठक झालीजानकर यांनी विजयदादांचे हे वक्तव्य अतिशय केविलवाणे आहे असे यावेळी म्हटले आहेजिल्ह्याच्या राजकारणात इतके दिवस राजकारण करणाºया विजयदादांकडे एकही सकारात्मक गुण नाही

सोलापूर: माजी मंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे वक्तव्य सत्तेसाठीच आहे, असा आरोप माळशिरस तालुक्यातील चांदापुरी साखर कारखान्याचे चेअरमन उत्तम जानकर यांनी पत्रकार परिषदेत केला. 

लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून ते विधानसभा निवडणुका होईपर्यंत विजयसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपचेच काम केले. पण आता विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील भाजपची सत्ता गेल्यानंतर मी आणखीन राष्ट्रवादीतच आहे असे विधान केले आहे. त्यांच्या विधानाने माळशिरस तालुक्याची इज्जत गेली आहे. विजयदादांचे नेतृत्व आता संपल्यातच जमा आहे. बुधवारी पुणे येथे त्यांनी हे विधान केल्यानंतर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 

जानकर यांनी विजयदादांचे हे वक्तव्य अतिशय केविलवाणे आहे असे यावेळी म्हटले आहे. त्यांचा मुलगा भाजपात जातो, त्यांचे भाऊ मागे फरफटत आहेत. या सगळ्या घडामोडीमुळे  त्यांच्या कुटुंबातच ताळमेळ नाही असे चित्र दिसत आहे. जिल्ह्याच्या राजकारणात इतके दिवस राजकारण करणाºया विजयदादांकडे एकही सकारात्मक गुण नाही, अशी टीका जानकर यांनी केली. विजयदादांकडे कर्तृत्व, इच्छा, तळमळ असे कोणतेही गुण दिसत नाहीत. तरीही त्यांनी इतके दिवस जिल्ह्यावर राज्य केले आहे. अशा  ज्येष्ठ नेत्याने आता पुन्हा अशा प्रकारचे वक्तव्य करायला नको होते असे आपले ठाम मत असल्याचे जानकर यांनी सांगितले. विजयदादांनी भाजपत प्रवेश केला काय किंवा न केला काय? दोन्ही निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभांची तयारी तर त्यांनीच केली होती. त्यावेळीही ते सत्तेसाठीच भाजपचे काम करीत होते आणि आताही त्यांनी केलेले वक्तव्य सत्तेसाठीच आहे असे जानकर यांनी यावेळी स्पष्ट केले. 

आमचा उमेदवार द्यावा ! झेडपीत सत्ता स्थापनेबाबत महाविकास आघाडीची आज बैठक झाली. त्या बैठकीलाही जानकर यांनी हजेरी लावली. या ठिकाणी मत व्यक्त करताना माळशिरस तालुक्यात निवडणुका लढविताना आमचा सातत्याने पराभव होत आहे. माळशिरस तालुक्यात आमचे नेतृत्व उभे राहण्यासाठी अध्यक्षपदासाठी आमचा उमेदवार द्यावा अशी मागणी केली. आपले संख्याबळ जमले आहे म्हणून भ्रमात राहू नका, सगळ्या सदस्यांना एकत्रितपणे सुरक्षित जागी हलवा, दुसºया बाजूनेही जोरात प्रयत्न सुरू असल्याचे जानकर यांनी निदर्शनाला आणले. 

टॅग्स :SolapurसोलापूरVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटीलPoliticsराजकारण