शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

आई राजा उदो उदो.......

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 14:09 IST

सकाळी साडेआठची विजापूर-औरंगाबाद गाडी सोलापूरच्या एसटी स्टॅण्डवर आली. स्टॅण्डवर प्रचंड गर्दी. आज शुक्रवार असल्यामुळे तुळजाभवानीच्या दर्शनाची ओढ लागलेली. सगळी ...

सकाळी साडेआठची विजापूर-औरंगाबाद गाडी सोलापूरच्या एसटी स्टॅण्डवर आली. स्टॅण्डवर प्रचंड गर्दी. आज शुक्रवार असल्यामुळे तुळजाभवानीच्या दर्शनाची ओढ लागलेली. सगळी भाविक मंडळी, चांगलं चुंगलं कापडं घालून तुळजापूरला निघालेले. आम्ही नोकरीनिमित्त निघालेल्या बँक आणि एलआयसी कर्मचाºयांची पण हीच गाडी बरोबर दहा वाजता उस्मानाबादला पोहोचणारी, तेव्हाची एकमेव गाडी. दर मंगळवारी आणि शुक्रवारी या गाडीत चढताना किमान एक-दोन जणांची पाकिटं मारली जायची,ही या गाडीची खासियत. ही पाकिटं अगदी बंदोबस्तात मारली जातात हे आम्हाला नंतर समजलं,पण तोपर्यंत आम्ही सगळेजण किमान एका पाकिटाला आणि पाच पन्नास रुपयाला मुकलो होतो.

आता देवीचे भक्त गाडीत म्हणल्यावर त्यात जास्त संख्या बायकांचीच,इरकली साड्या, कपाळाला जुन्या रुपयाएवढं कुंकू,कुणीकुणी जटा ठेवलेल्या अशी गर्दी जास्त आणि अशी बाई शेजारी बसली की तिच्या डोक्यातून तेलाचा असा काही वास सुटायचा की अगदी मळमळून उलटी होते की काय, असं वाटायचं. पण नंतर या गोष्टीची सवय झाली,तशी या सगळ्या गोष्टीची सवय व्हायला लागली. एसटी कंडक्टर तर भारी सरावलेले होते. सोलापूर सुटलं की पंधराव्या मिनिटाला हगलूर नावाचं एक गाव आहे. पूर्वी एसटीला दरवाजा पाठीमागे असायचा,एखादी म्हातारी मुद्दाम पुढं जाऊन बसायची,साधारण हगलूर जवळ आलं की ती ‘एक पंढरपूर द्या म्हणायची’मग लोकं ओरडायची ‘ए म्हातारे,ही तुळजापूर गाडी हाय, उतर खाली़’

असं म्हणल्यावर ती खाली उतरायची.एकदा अशीच एक म्हातारी गाडीत बसली,हगलूर जवळ आल्यावर कंडक्टरला तिनं पंढरपूरचं तिकीट मागितलं तिला वाटलं नेहमीप्रमाणे गाडी थांबवतील, आपण उतरू खाली, पण गाडी काही थांबलीच नाही, लोक ओरडायला लागले कंडक्टर गाडी थांबवा,म्हातारीला पंढरीला जायचं आहे, चुकून ह्या गाडीत बसलीय. कंडक्टर विजापूरचा, कुछ नहीं भाईसाब, इसका गाव हगलुरीच है, हमेशा ऐसाच नाटक करती, या आनेके बादीच टिकट मांगती पंढरपूर का, हम उतार देते, सिधी घर जाती फुकट मे!

त्या दिवशी कंडक्टर आणि ड्रायव्हर दोघेही चिडलेच होते, कंडक्टर ड्रायव्हरला म्हणला ‘इर्षादभाई आज इस्कु हम औरंगाबादकूच छोडेंगे, फिर जिंदगी मे फुकट ट्रॅव्हल नहीं करेंगी. सगळे लोक हसले, म्हातारी खाली उतरली गाडी पुन्हा सुरू झाली. तीन सीटच्या खिडकीला मी बसलेलो, मध्ये माझा एक मित्र बसलेला आणि पलीकडे जटा असलेली एक बाई बसलेली, कपाळभर कुंकू, गळ्यात सोन्याची बोरमाळ, माझा मित्र जरा जास्तच इरसाल होता, त्याचं काय झालं,तुळजापूर जवळ आलं आणि जसा तुळजापूरचा डोंगर दिसायला लागला की गाडीतल्या दोन-चार जणी, घुमायला लागायच्या.त्या दिवशी पण तेच झालं,आमच्या सीटवरची बाई,अळोखे पिळोखे देऊन जोरात घुमायला लागली,माझा मित्र त्या बाईला ऐकू जाईल अशा आवाजात मला म्हणाला,अबे सत्या, या बाईच्या गळ्यातली बोरमाळ कुठं गेली? पडली का काय? तशी ती बाई गपकन थांबली आणि गळ्यात चाचपून बघायला लागली बोरमाळ आहे की नाही ते, हाय हाय गळ्यातच हाय, असं म्हणून पुन्हा घुमायला लागली,आई राजा उदो उदो.......- कवी सतीश वैद्य, सोलापूर

टॅग्स :Solapurसोलापूर