शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांची शिकार करणाºया चौघांना सोलापूरात पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 12:48 IST

सोलापूर : ससे, काळविटांच्या शिकारीसाठी जाळे, धारदार शस्त्र घेऊन निघालेल्या चौघा संशयित शिकाºयांना वनविभाग व नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कल, रानवेध निसर्ग मंडळाच्या सदस्यांनी ताब्यात घेतले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे ही कारवाई करण्यात आली. मागील काही दिवसांपासून कुत्र्यांच्या मदतीने वन्यजीवांना हुसकावून त्यांच्या शिकाराचे प्रकार वाढत असल्याच्या तक्रारी वनविभागाकडे करण्यात आल्या. त्यामुळे उपवनसंरक्षक ...

ठळक मुद्देमंद्रुप व परिसरात शिकाराचे प्रकार सर्रास घडतातवनविभागाच्या पथकाने त्यांना बसस्थानक परिसरात ताब्यात घेतले

सोलापूर : ससे, काळविटांच्या शिकारीसाठी जाळे, धारदार शस्त्र घेऊन निघालेल्या चौघा संशयित शिकाºयांना वनविभाग व नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कल, रानवेध निसर्ग मंडळाच्या सदस्यांनी ताब्यात घेतले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे ही कारवाई करण्यात आली. 

मागील काही दिवसांपासून कुत्र्यांच्या मदतीने वन्यजीवांना हुसकावून त्यांच्या शिकाराचे प्रकार वाढत असल्याच्या तक्रारी वनविभागाकडे करण्यात आल्या. त्यामुळे उपवनसंरक्षक संजय माळी यांनी स्वत:चे वाहन नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कलच्या सदस्यांना गस्तीसाठी दिले. रानवेध निसर्ग मंडळ व नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कलच्या पथकाने  मंद्रुप, माळकवठे, निंबर्गी, कुरघोट, वांगी शिवारात वनविभागाच्या पथकाने गस्त घातली. मंद्रुपमध्ये शिकारासाठी काही जण जाळे घेऊन निघाल्याची माहिती खबºयामार्फत समजली. वनविभागाच्या पथकाने त्यांना बसस्थानक परिसरात ताब्यात घेतले. 

शिवानंद सिद्धप्पा धाणे (वय २८, रा. रेवतगाव, ता. इंडी, कर्नाटक), जक्कप्पा धरेप्पा खांडेकर (वय ३२, रा. कर्जाळ, ता. मंगळवेढा), महांतेश पांडुरंग धाणे (वय २५, रा. रेवतगाव, ता. इंडी), चंद्रकांत मलकारी माळी (वय २४, रा. कर्जाळ, मंगळवेढा) अशी वनविभागाने पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपये दंड, आठ दिवस दररोज वनविभागाच्या कार्यालयात हजेरी लावणे व पुन्हा गुन्हा न करण्याचे हमीपत्र देण्याच्या अटीवर त्यांना सोडण्यात आले. ही कारवाई उपवनसंरक्षक संजय माळी, वनपरिक्षेत्र अधिकारी निकेतन जाधव, वनपाल शीला बडे, नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कलचे भरत छेडा, पप्पू जमादार, तरुण जोशी यांच्या पथकाने केली. रानवेध निसर्ग मंडळाच्या सदस्यांनी मदत केली. 

यत्नाळ, वळसंग शिवारात जप्त केले जाळे- अक्कलकोट रस्त्यावरील दक्षिण सोलापूर तालुक्यातील यत्नाळ, वळसंग शिवारात ससे, तितर पक्षी पकडण्यासाठी लावलेले जाळे नेचर कॉॅन्झर्व्हेशन सर्कलच्या सदस्यांनी जप्त केले. शिवानंद हिरेमठ, अमोल मिस्कीन यांच्या पथकाने ही कारवाई केली. गेल्या आठवड्यात कुंभारी शिवारात सशांची शिकार करणाºया चौघांना पकडण्यात आले होते.

मंद्रुप शिवारात गस्त आणखी वाढणार- मंद्रुप व परिसरात शिकाराचे प्रकार सर्रास घडतात. कर्नाटकातून काही लोक शिकारीसाठी या परिसरात येत असल्याने गस्त पथक वाढविण्यात येणार असल्याचे उपवनसंरक्षक संजय माळी यांनी सांगितले. शिकारीच्या दुर्घटना घडत असल्यास वनविभागाच्या १९२६ या टोल फ्री क्रमांकावर माहिती कळवावी, असे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले. 

टॅग्स :Solapurसोलापूर