शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शंभर वर्षांपूर्वी मातृभूमीच्या रक्षणासाठी रक्त सांडणाºया सोलापुरी जवानांचे स्मारक दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 15:13 IST

सोलापूर : इतिहासातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाºया युद्धांपैकी पहिल्या व दुसºया महायुद्धात मातृभूमीच्या रक्षणासाठी इंग्लंडच्या बाजूने भारतातील सैनिकांनी लढा ...

ठळक मुद्देपहिल्या आणि दुसºया महायुद्धात लढलेल्या आणि शहीद झालेल्या सैन्यांचा इतिहास सांगणारा स्मृतिस्तंभ ब्रिटिशांनी १०० वर्षांपूर्वी बांधला सोलापूरच्या शूरवीरांचा इतिहास भावी पिढीला समजण्यासाठी या वास्तूचे संवर्धन होणे गरजेचे

सोलापूर : इतिहासातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाºया युद्धांपैकी पहिल्या व दुसºया महायुद्धात मातृभूमीच्या रक्षणासाठी इंग्लंडच्या बाजूने भारतातील सैनिकांनी लढा दिला. लढ्यात शहीद झालेल्या सोलापूरच्या सैनिकांची आठवण म्हणून ब्रिटिशांनी मेकॅनिकी चौकात उभारलेले स्तंभ आज दुर्लक्षित असून, त्याचे विद्रुपीकरण होत आहे.  गेल्या वर्षी या महायुद्धाला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. 

२८ जुलै १९१४ ते ११ नोव्हेंबर १९१८ दरम्यान पहिले महायुद्ध चालले. या युद्धात इंग्लंडच्या बाजूने भारतातील सैनिकांचा मोठा सहभाग होता. जगभरातून ७ कोटी सैनिकांनी युद्धात सहभाग घेतला होता, त्यात सोलापुरातील सैनिकांनीसुद्धा आपले योगदान दिले होते. या युद्धाची आठवण म्हणून ब्रिटिशांनी १९२० मध्ये मेकॅनिकी चौकात स्मारक बांधले आहे. युरोपियन क्लासिकल शैलीचे बांधकाम आहे. बाजूला कोरीव काम केलेल्या दिव्यांचा खांब असून, तो चौथºयावर मध्यभागी आहे. याच ठिकाणी चौथºयावर जाण्यासाठी पायºया आहेत. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सोलापुरात सुशोभीकरणासाठी हे काम झाले आहे. 

युरोप व आशियामध्ये दोस्त राष्ट्रे व अक्ष राष्ट्रे यांच्यात १९३९ ते १९४५ दरम्यान जागतिक स्तरावर दुसरे महायुद्ध झाले होते. दोस्त राष्ट्रांमध्ये चीन, रशिया, इंग्लंड, अमेरिका व इतर देशांचा तर अक्ष राष्ट्रात जर्मनी, इटली, जपान व अन्य देशांचा समावेश होता. जागतिक स्तरावरील एकूण ७० देशांचे सैन्य दुसºया महायुद्धात सहभागी झाले होते. युद्धात सहा कोटींपेक्षा जास्त सैनिक शहीद झाले होते. याही युद्धात सोलापुरातील सैनिकांचा सहभाग होता. 

दुसºया महायुद्धात या ५९ सैनिकांनी घेतला होता सहभाग...- दुसºया महायुद्धात सोलापुरातील विविध तालुक्यांतील ५९ सैनिकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये शिवराम गेनू निंबाळकर (कोंडी, उत्तर सोलापूर), मुरलीधर पांडू कदम (कासेगाव, दक्षिण सोलापूर), गुरुबाळा करिअप्पा साबळे (विंचूर, दक्षिण सोलापूर), बाबू गंगाराम देशमुख (बोरामणी, दक्षिण सोलापूर), बाबू दामोदर वेदपाठक (फुलचिंचोली, पंढरपूर), सांगोला तालुक्यातील पांडुरंग बाबू राऊत, तात्या धोंडी इंगोले (मेडशिंगी), मारुती नारायण शोडके (पाचेगाव बु.), बाळकृष्ण सखाराम घाडगे (हातीद), जयवंत एकनाथ वाळके (उदनवाडी), भानुदास पंढरीनाथ शितोळे (चिणके), कृष्णा नामदेव चोरमुले (येलमर मंगेवाडी), ज्ञानोबा बाळू माने, हनुमंत भीमराव गायकवाड, एकनाथ आबाजी माने, पांडू मनगेनी व्हल्ले (पारे), बाळप्पा चंद्रप्पा हेडगे, आप्पा नारायण माळी, शंकर धोंडी गुरव (जवळे), मारुती आबा मिसाळ (डोंगरगाव). माळशिरस तालुका- महादेव लक्ष्मण दंडवते (अकलूज), बाबा मारुती वाघमारे (कोंडभावी), दगडू गोपाळ हिवरे (पुरंदावडे), रामहरी सीताराम सुतार (वेळापूर), राजेंद्र बाजी जाधव, निवृत्ती नाना भुयटे (मळोली), नामदेव मारुती बाबर (तांदूळवाडी). मोहोळ तालुका- मसा बाबाजी उडानशिव, सावळा ऊर्फ नाना दिनकर बनसोडे (मोहोळ), तात्या दशरथ माळी (कुरुल), विठ्ठल बाबाजी भोसले (कोथळे), गेनबा भाऊ नागणे (तांबोळे), दगडू बाबू सातपुते, भगवान कृष्णा वसेकर, सुखदेव दशरथ माने (पाटकूल), करमाळा- पंढरीनाथ वासुदेव गोसावी (केत्तूर), चंद्रभान गेनू फुके (कारंजे), नामदेव खंडू जगताप (देवळाली), लक्ष्मण भिवा लांडगे (झरे), शिवाजी साधू राऊत (कोंडज), देविदास भगवान न्हावी, बलभीम रामचंद्र थोरात, गुलाब अब्बास पाटेकरी, धोंडीराम गंगाराम (करमाळा), भानुदास निवर्ती मेंढे (मलवडी), संभू खंडू ढेरे (वीट), माढा- विठोबा रामा सलगर (कुर्डूवाडी), महिबूब इस्माईल (कुर्डूवाडी), गोविंद रामा जाधव (माढा), ज्ञानू धोंडी नवले, लोभा धोंडी नरूरे, मार्तंड धोंडी नरूरे, माणिक भिवा आवताडे (टाकळी टेंभू), दगडू बाबाजी शिंदे, सदाशिव तुकाराम विरकर (आढेगाव), दगडू गणू पिले, सिद्राम गाता पवार (उजनी), विश्वनाथ दाजी सलगर, यशवंत दाजी थोरात (पडसाळी) आदी सैनिकांची नावे कोरण्यात आली आहेत. 

हेरिटेज समितीची स्थापना करा : सीमंतिनी चाफळकर- पहिल्या आणि दुसºया महायुद्धाची साक्ष देणारा स्तंभ मेकॅनिकी चौकात उभा आहे. मात्र याची माहिती बहुतांश लोकांना नाही. सध्या स्मृतिस्तंभाची अवस्था वाईट आहे. पिंपळाचे झाड वाढले असून ते वेळीच न काढल्यास स्तंभाला चिरे पडत आहेत. पिंपळाचे झाड तेथून हलवले नाही तर स्तंभ ढासळण्याची शक्यता आहे. १०० वर्षांची साक्ष देणाºया ऐतिहासिक स्तंभाचे संवर्धन होणे गरजेचे आहे. महानगरपालिकेने या वास्तूची दुरुस्ती करून देखभाल केली पाहिजे. यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. संवर्धनासाठी हेरिटेज समितीची स्थापना करावी, अशी अपेक्षा हेरिटेज वास्तूचे तज्ज्ञ अभ्यासिका सीमंतिनी चाफळकर यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. 

पहिल्या आणि दुसºया महायुद्धात लढलेल्या आणि शहीद झालेल्या सैन्यांचा इतिहास सांगणारा स्मृतिस्तंभ ब्रिटिशांनी १०० वर्षांपूर्वी बांधला आहे. फुटलेल्या फरशा दुरुस्त करून स्वच्छता राखण्यात यावी. सुशोभीकरण करून माहिती सांगणारा बोर्ड लावण्यात यावा. सोलापूरच्या शूरवीरांचा इतिहास भावी पिढीला समजण्यासाठी या वास्तूचे संवर्धन होणे गरजेचे आहे. - आनंद चंदनशिवे, नगरसेवक. 

टॅग्स :Solapurसोलापूर