शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

माणुसकी विसरली नाही; हल्ल्यानंतरही डॉक्टरांनी बजावले कर्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 12:49 IST

रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून भोजप्पा तांड्यावरील रुग्णांवर केले उपचार

ठळक मुद्देडॉक्टरांनी झालेले भांडण विसरून माणुसकीच्या नात्याने तातडीने त्या कुटुंबीयांना मदत केलीसात जणांना थेट विमा रुग्णालयात उपचारासाठी हलविले तर इतर अकरा जणांना क्वारंटाईन केंद्रात पाठविलेरुग्णालयात उपचार घेणाºया ‘त्या’ सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील कवठे येथील भोजप्पा तांड्यावर पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांच्या पथकावर हल्ला करण्यात आला तरी डॉक्टरांनी माणुसकी विसरली नसल्याचे दिसून आले आहे. हल्ला करणाºयांच्या कुटुंबातील १८ जणांना रुग्णालयात दाखल केल्यावर त्यातील सात जणांना कोरोनाची लागण झाल्याचे बुधवारी स्पष्ट झाले आहे. 

शनिवार, ६ जून रोजी सिव्हिलच्या प्रयोगशाळेकडून अहवाल आल्यानंतर त्यात कवठे येथील भोजप्पा तांड्यावर राहणाºया पोलिसाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. अहवाल मिळताच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. पी. कुलकर्णी, तिºहे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोडसे हे पथकासह रवाना झाले. भोजप्पा तांड्याच्या प्रवेशद्वारावर एका तरुणाने गाडी अडवून हुज्जत घातली. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलकर्णी यांना शिवीगाळ करणाºया तरुणास समजावून सांगण्यासाठी डॉ. गोडसे पुढे सरसावल्यावर त्या तरुणाने पित्याच्या मदतीने त्यांच्यावर हल्ला केला. यात डॉ. गोडसे जखमी झाले. त्यानंतर सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे अधिकारी तेथे आले व त्यांनी हल्लेखोरावर कारवाई केली. कोरोना प्रतिबंधासाठी काम करणाºया वैद्यकीय पथकावरच हल्ला झाल्याने प्रकरण गंभीर बनले. त्यामुळे पथकाने येथे काम न करण्याचा निर्णय घेतला; पण दुसºया दिवशी त्याच कुटुंबातील व्यक्तींना त्रास होत असल्याचा फोन आला. 

डॉक्टरांनी झालेले भांडण विसरून माणुसकीच्या नात्याने तातडीने त्या कुटुंबीयांना मदत केली. त्यांच्या घरी अ‍ॅम्ब्युलन्स पाठवून सर्दी, ताप व खोकल्याचा त्रास सुरू झालेल्या सात जणांना थेट विमा रुग्णालयात उपचारासाठी हलविले तर इतर अकरा जणांना क्वारंटाईन केंद्रात पाठविले. 

रुग्णालयात उपचार घेणाºया ‘त्या’ सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. डॉक्टरांनी वेळेत मदत केल्याने त्यांच्यावरील धोका टळला आहे. रुग्णसेवा हीच ईशसेवा मानून आम्ही आमचे कर्तव्य पार पाडले असल्याचे डॉ. गोडसे यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूरhospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टर