शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाची माणूसकी; वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 15:43 IST

उन्हाची तीव्रता वाढली; अक्कलकोट वनविभागाचा कौतुकास्पद उपक्रम

ठळक मुद्देसध्या ४० पेक्षा जास्त तापमान वाढलेले असल्याने वन्यप्राण्यांचे पाण्यासाठी हालउडगी, काझीकणबस, किरनळ्ळी, वागदरी, कर्जाळ, बोरेगाव येथील वनक्षेत्रात टँकरद्वारे पाणीपुरवठापावसाळ्यातील तीन महिने वगळता इतर महिने मात्र प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती

उडगी : सध्या ४० पेक्षा जास्त तापमान वाढलेले असल्याने वन्यप्राण्यांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन वनविभागाच्या वतीने तालुक्यातील उडगी, काझीकणबस, किरनळ्ळी, वागदरी, कर्जाळ, बोरेगाव येथील वनक्षेत्रात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे़वनविभागाने वनक्षेत्रात बनविलेल्या कृत्रिम पाणवठ्यात टँकरद्वारे पाणी सोडले जात आहे.

वनक्षेत्रात विविध प्रकारच्या पशुपक्षी आणि प्राण्यांचा अधिवास आहे. मात्र पावसाळ्यातील तीन महिने वगळता इतर महिने मात्र प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते़ त्यामुळे तालुक्यातील सर्वच पाणवठ्यात पाणी सोडण्यासाठी कर्मचारी नियुक्त केले आहेत़ उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे बरेच पशुपक्षी हे पाण्यासाठी स्थलांतर करतात़ त्यामुळे वनविभागाने कृत्रिम पाणवठ्यांची संख्या वाढवावी आणि पक्ष्यांची तहान भागवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी पक्षीमित्र गिरमल जमादार यांनी केली होती.

८४५ हेक्टर वनक्षेत्र- अक्कलकोट तालुक्यात ८४५ हेक्टर वनक्षेत्र आहे़ ग्रामीण भागात वाढत्या तापमानामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे़ जलस्रोतही कोरडे पडले आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तालुक्यात उडगी (२), काझीकणबस, किरनळ्ळी, वागदरी, कर्जाळ, बोरेगाव या ठिकाणी प्रत्येकी एक वनक्षेत्र आहे़

सध्या तापमान वाढल्याने वन्यप्राण्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबविण्यासाठी वनविभागातर्फे पाणवठ्यात नियमित टँकरद्वारे पाणी सोडले जात आहे. संचारबंदी काळातसुध्दा मुक्या प्राण्यांना पाण्याची कमतरता भासू दिली जाणार नाही़ - प्रवीणकुमार बडगे,उपवनसंरक्षक, सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरTemperatureतापमानwater shortageपाणीकपात