शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
6
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
8
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
9
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
10
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
11
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
12
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
13
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
14
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
15
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
16
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
17
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
18
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
19
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
20
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?

माणुसकी; बार्डी येथील वन्यप्राण्यांसाठी केली चारा अन् पाण्याची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 16:10 IST

वन्यप्राण्यांसाठी मंदिर समिती आली धावून; पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा निर्णय....!

ठळक मुद्दे१७ मार्च पासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्याचा निर्णयमजूर व निराधार नागरिकांना मानवतावादी भूमिकेतून व सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मंदिर समितीच्या वतीने दररोज ३००० फूड पॅकेट

पंढरपूर :  बार्डी (ता. पंढरपूर) येथील वन क्षेत्रामध्ये ३०० पेक्षा जास्त गाई व २०० पेक्षा जास्त हरीण, काळवीट व इतर वन्यजीवांची चारा व पाण्याची सोय श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीकडून करण्यात येत आहे. कोरोनाचा पादुर्भाव वाढल्याने अनेक गोष्टीवर निर्बंध आल्याने या स्वयंसेवी संस्थांनी इकडे पाठ फिरवली. त्यामुळे या वन्यजीवाचा खास करून गाईचा चाºयाचा प्रश्न गंभीर झाला होता. ही बाब लक्षात घेवून मंदिर समितीने चारा पुरविण्याचा निर्णय घेतला असल्याचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले. 

बार्डी येथील वन्यप्राण्यांना चारा आणि पाण्याची टंचाई भासत असल्याची बाब मंदिर समिती सदस्य संभाजी शिंदे यांच्या निर्दशनास आल्यानंतर त्यांनी मंदिर समितीकडे या जनावरांच्या चाºयाची व पाण्याची व्यवस्था करावी अशी आग्रहाची मागणी केली होती. त्यानंतर सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर व कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सदर ठिकाणी सक्षम भेट दिली व वस्तुस्थिती ची पाहणी केली. त्यानंतर सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व इतर सर्व सदस्य यांच्याशी चर्चा करून या वन्य प्राण्यांना मंदिर समितीने वाचविण्याचा निर्णय घेतला.  यातील पहिला टप्पा म्हणून दि ४  मे २०२० रोजी २५०० पेंडी देशी कडबा या वन क्षेत्राजवळील सुखदेव महाराज मठात ठेवण्यात आला आहे. त्याप्रमाणे दररोज १५० ते २०० पेंडी चारा या वन्य जीवांना देण्यास सुरुवात केली आहे. तसेच दर दोन दिवसांनी २५००० लिटर पाणी टँकर द्वारे पाठऊन तेथील पाणी टाक्या व पाणवठे भरून घेण्यात येत आहेत. जेणेकरून या तहानलेल्या जीवांना पाणी वेळेत उपलब्ध होईल. मजूर निराधारांना ३ हजार फूड पॅकेटचे वाटप

१७ मार्च पासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्याचा निर्णय घेतल्यापासून पंढरपूर शहर व परिसरात अडकून राहिलेल्या

मजूर व निराधार नागरिकांना मानवतावादी भूमिकेतून व सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मंदिर समितीच्या वतीने दररोज ३००० फूड पॅकेट देण्यात येत आहेत अशी माहिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर