शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

माणुसकी जिवंत असल्यानेच कर्फ्यूतही बाबा परतले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 11:41 IST

मुलांनी मानले देवाचे आभार; परप्रांतीयांच्या मदतीमुळे गहिवरले चव्हाण कुटुंबीय

ठळक मुद्देसध्या सर्वत्र कडक कर्फ्यू लागू आहेनागरिकांच्या माणुसकीमुळे आमचे बाबा सुखरूप घरी पोहोचलेत्या व्यक्तीच्या दोन्ही मुलांनी साश्रूनयनांनी देवाचे हृदयपूर्वक आभार मानले

सोलापूर : सध्या सर्वत्र कडक कर्फ्यू लागू आहे. अशात आपल्या घरातील एखादी व्यक्ती मिसिंग झाल्यास आपली अवस्था काय होईल, हे न सांगितलेले बरे येथील गवळी वस्ती परिसरातील पंचेचाळीस ते पन्नास वर्षीय व्यक्ती पाच दिवसांपूर्वी वाट चुकून थेट कर्नाटकात पोहोचली़ विजापूर परिसरात पोहोचल्यानंतर त्यांची अवस्था बिकट झाली़ खाण्या-पिण्याचे वांदे झाले. तिथेही कडक पोलीस बंदोबस्त तैनात होता़ त्या व्यक्तीची हतबलता पाहून तेथील पोलीस आणि नागरिकांनी त्यांची आपुलकीने विचारपूस केली़ त्यानंतर त्यांना सोलापूरचा रस्ता दाखवला़ त्या अज्ञात पोलीस आणि नागरिकांच्या माणुसकीमुळे आमचे बाबा सुखरूप घरी पोहोचले अशा भावना व्यक्त करत त्या व्यक्तीच्या दोन्ही मुलांनी साश्रूनयनांनी देवाचे हृदयपूर्वक आभार मानले.

अंबादास विठ्ठलसा चव्हाण, असे या वाट चुकलेल्या व्यक्तीचे नाव आहे़ चव्हाण हे आकाशवाणी केंद्राशेजारील गवळी वस्ती परिसरातील रहिवासी आहेत़ अंबादास चव्हाण हे टेलर आहेत़ त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार अंबादास हे मानसिकदृष्ट्या आजारी आहेत़ वडील घरी परतल्यानंतर अंबादास यांचे चिरंजीव रवी आणि धीरज यांचे अश्रू अनावर झाले़ त्यांनी भावूकपणे त्यांच्या भावना व्यक्त केल्या़ आमचे वडील घरी येण्याकरिता ज्या नागरिकांनी मदत केली ते सर्व देवाचे अवतार असल्याची प्रांजळ भावनाही त्यांनी व्यक्त केली.

शनिवारी दि़ २१ मार्च रोजी पहाटे साडेपाच ते सहा दरम्यान अंबादास नेहमीप्रमाणे वॉकिंगकरिता घराबाहेर पडले़ त्यानंतर त्यांना आपण कुठे चाललो आहोत, याची त्यांना कल्पना आली नाही़ ते थेट विजापूर रस्त्यामार्गे विजापूरकडे निघाले़ वाटेत त्यांना पोलिसांनी थांबवले, ते काहीच बोलले नाहीत़ २२ मार्च रोजी ते विजापूरला पोहोचले़ त्यानंतर काही नागरिकांनी त्यांना खायला दिले़ इकडे कशाकरिता आला आहात, असे विचारले असता अंबादास भांबावले़ त्यांना काहीच सुचेना़ सोलापूरहून आलो आहे, असेच सांगत राहिले़ तेथील पोलिसांनी आणि सुज्ञ नागरिकांनी त्यांना सोलापूरचा मार्ग दाखवत घरी जाण्याचा सल्ला दिला़ ते पुन्हा विजापूर मार्गे सोलापूरकडे जाणाºया वाहनांची मदत घेत ते सैफुलपर्यंत पोहोचले़ तेरामैल आणि सोरेगाव परिसरातील नागरिकांनी त्यांना मदत केल्याची माहिती चव्हाण कुटुंबीयांनी लोकमतला दिली़ सैफुल येथील काही नागरिकांनी अंबादास यांच्या घरी फोन करून याबाबत माहिती दिली़ त्यानंतर बुधवारी २५ मार्च रोजी दुपारी अंबादास यांचे कुटुंबीय सैफुलला जाऊन अंबादास यांना घरी घेऊन आले.

आई म्हणाली...देवानेच माझ्या मुलाला पाठवले- अंबादास हरवल्यानंतर आई प्रेमाबाई आणि वडील विठ्ठलसा हे दोघे फारच चिंतेत होते़ बुधवारी दि़ २५ मार्च रोजी एकाकी त्यांचा मुलगा सैफुलजवळ आहे, असा निरोप मिळाला़ त्यानंतर त्यांना थोडा दिलासा मिळाला़ सोलापुरात कडक कर्फ्यू आहे़ अशात मुलाला घरी कसे आणायचे याची चिंता त्यांना लागून राहिली़ चव्हाण कुटुंबीयांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले़ तेथील पोलिसांना त्यांनी सारी हकिकत सांगितली़ पोलिसांनी त्यांना तुम्ही बिनधास्त जा़ गर्दी करून जाऊ नका़ वाटेतील पोलिसांनाही परिस्थिती सांगा ते तुम्हाला सोडतील, असे पोलिसांकडून दिलासा मिळाल्यानंतर त्यांना घरी आणले.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस