शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

हाकाट्यांची हूल... सावजाची चाहूल...!

By सचिन जवळकोटे | Updated: December 23, 2018 09:44 IST

सिंहाची शिकार... मुश्किल है लेकिन नामुमकीन नहीं ...!

लगाव बत्ती !

- सचिन जवळकोटे 

पूर्वीच्या काळी राजे शिकारीसाठी जंगलात जायचे, तेव्हा त्यांच्यासोबत असायचे हाकाटे. ढोल-पिपाण्याच्या आवाजाची हूल उठविताच हवं ते सावज सापडायचं आयतंच राजाच्या जाळ्यात. आता काळ बदलला. राजे गेले; ‘हूल’ उठवून ‘शिकार’ करण्याची पद्धत मात्र आजतागायत सुरूच राहिली. फरक इतकाच की, पूर्वी अशी शिकार जंगलात केली जायची... आजकाल राजकारणात.बारामतीकरांची गेम..  ‘कमळ’वाले मात्र करताहेत डबल गेम !अकलूजच्या जंगलात वर्षानुवर्षे सिंहांचंच राज्य. सत्तेची आयाळ झडूनही इथला प्रमुख थोरला सिंह आजही कळपाचा राजाच. बाकीचे छावेही आता मोठाले सिंह बनून एकमेकांवर अधूनमधून गुरगुरणारे. उदाहरणदाखल ‘शंकर’चं भकास माळरान. असो. या सिंहांनी शिकार करायची अन् बाकीच्यांनी ‘डोळस’पणे आयता ताव मारायचा, ही इथली परंपरा. मात्र, यंदा या सिंहांवर भलतंच संकट कोसळलंय.माणदेशातले एक देशमुखी हाकाटे ‘बारामतीचा संदेशऽऽ बारामतीचा आदेशऽऽ’ म्हणत उमेदवारीची पिपाणी घेऊन जंगलात गोंधळ घालू लागलेत. त्यात भरीस भर म्हणून सोलापुरातले दुसरे देशमुखी हाकाटे स्थलांतराचा ढोल पिटविण्यात मश्गुल झालेत. सिंहांच्या विरोधात इतर साºयांना एकत्र आणण्याची खेळी खेळू लागलेत.दोन देशमुखांच्या या गावगोंधळात जंगलातला ‘थोरला सिंह’ भलताच डिस्टर्ब झालाय. दुसºया तरुण सिंहाला याचं गांभीर्य अद्याप जाणवलं नसावं. मात्र ‘बारामतीकरांची शिकार करण्याची मिठी छुरी’ अनेक दशकांपासून माहीत असलेल्या थोरल्या सिंहानं ‘सेफ झोन’चा आसरा घेण्याचं ठरवलंय. मात्र, याच ठिकाणी ‘कमळाचं जाळं’ घेऊन कसलेला शिकारी सिंहाची वाट बघतच बसलाय. म्हणजे बघा.. ‘प्रभाकर’ हाकाट्यांची हूल उठवलीय ‘बारामती’करांनी. मात्र सिंहाची शिकार करण्यासाठी व्यवस्थित जाळं लावलंय ‘देवेंद्रपंत’ शिकाºयांनी... अन् नेहमीची वाट चुकवून हा सिंह आपल्या जाळ्यात सापडावा म्हणून ढोल बडवताहेत ‘सुभाषबापू’ हाकाटे. क्या बात है... लगाव बत्ती !जाता-जाता अंदर की बातथोरले दादा अकलूजकर अन् देवेंद्रपंत नागपूरकर यांची नुकतीच प्राथमिक गुप्त चर्चा झाल्याची कुजबुज आम्हा पामरांच्या कानावर. जर माढा लोकसभेला दिली गेली  ‘घड्याळाची चावी प्रभाकरांच्या हाती’... तर शेवटच्या क्षणी धाकटे दादा अकलूजकर हुंगू शकतील माढ्यात ‘कमळाचं फूल’.  तसंच थोरल्या दादांनाही उत्तरेत कुठंतरी घडू शकतं राज्यपाल भवनाचं छानपैकी दर्शन.. आता तुम्ही म्हणाल उत्तर भारतच का ? कारण दक्षिणेतली ‘काडऽऽकूड’ भाषा दादांना नाही कळणार अन् ‘दादां’चं मराठी पुटपुटणं त्या लोकांना नाही उमजणार.भाषा नव्या नेतृत्वाची.. सवय जुन्या आमदारकीची !गेल्या आठवड्यात ‘गिनीज बुक’वाले म्हणे मोहोळमध्ये आलेले. टाकळी सिकंदरच्या मेळाव्यात या वर्षातील सर्वात मोठा जोक झाल्याचं या टीमला कुणीतरी सांगितलेलं. ‘मोहोळची सूत्रं तरुण पिढीकडं सोपवावीत,’ असा अनाहूत सल्ला बबनदादांनी राजन मालकांना दिला. ‘माजी’ असूनही आजपावेतो ‘आजी’ म्हणूनच ओळखल्या जाणाºया या मोहोळच्या आमदारांनीही (!)  हसून दाद दिलेली. हा पहिला जोक. गंमत म्हणजे, ही कॉमेंट कुणी करावी ? वर्षानुवर्षे माढ्याची आमदारकी भोगणाºया बबनदादांनी. हा दुसरा जोक. हे ऐकून संजयमामांनाही म्हणे भरून आलं. ‘बस करो काकाऽऽ अब कितना रुलाओगे ?’ असंही म्हणे मामांना वाटलं. करमाळ्याच्या खड्ड्या-राड्यात इम्पोर्टेड गाड्या घालून-घालून झिजलेली टायरंही सुखावली. विशेष म्हणजे, याच बबनदादांना नव्या नेतृत्वाचा सल्ला देणारे कोण ? ..तर बार्शीचे दिलीपराव. आता हा सर्वात मोठा तिसरा जोक. त्यांची तिसरी पिढी राजकारणात आली तरी तालुक्यातली सूत्रं अजूनही यांच्याच हातात. गाढ झोपेतही म्हणे ‘रिमोट’वरचा हात थोडाही ढिला होत नसतो. जवळपास अशीच परिस्थिती अकलूज, पंढरपूर, सांगोल्याला अन् सोलापुरात.कार्यकर्त्यांची इच्छासांगोल्यात तर ‘कार्यकर्त्यांची इच्छा’ हा परवलीचा शब्द. आयुष्यभर नेत्यांच्या सभांमधल्या सतरंज्या उचलून-उचलून दमलेली ही बिच्चारी कार्यकर्ते मंडळी कधी अन् कुठं इच्छा व्यक्त करतात, हे मात्र आजपावेतो सांगोलेकरांना कधी समजलंच नाही. सगळ्यात भारी म्हणजे, ‘कार्यकर्त्यांची इच्छा’ हाच शब्द सोलापुरातही लाडक्या सुपुत्रांनी उचललेला. आजपावेतो अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी हा शब्द कृतकृत्य होऊन वापरलेला; यंदा मात्र हेच वाक्य ते मनापासून उच्चारत असल्याचं सोलापूरकरांना जाणवू लागलंय. कारण ‘सुपुत्रांच्या इच्छेपेक्षा पक्षाची गरज अधिक मोठी’ असल्याचं स्पष्ट झालंय. अन्यथा इतक्या वेळेपर्यंत प्रणितीताई लागल्याही असत्या लोकसभेच्या प्रचाराला.. लगाव बत्ती.सोलापूरला म्हणे‘ढोबळ’मानानं कुणीही निवडून येतोगेल्या लोकसभेला खासदार वकील सोलापुरात निवडून आले काय... यंदा साºयांच्याच स्वप्नांना धुमारे फुटू लागलेत बघा.  ‘सोलापुरात कुणीही निवडून येऊ शकतो’, असा भास प्रत्येकाला होऊ लागलाय... म्हणूनच की काय, साबळेंच्या नावानं सोलापूर-पंढरपूरचं रेस्ट हाऊस वरचेवर बुक होऊ लागलंय. गौडगावच्या मठातही ‘योगी आदित्यनाथ’चा ‘मराठी अवतार’ बघण्यासाठी महाराजांकडं दर्शनाला गर्दी होऊ लागलीय. मुगळेंचे राजेंद्रही कानडी हेल टाळून शुद्ध मराठी बोलू लागलेत.मध्यंतरी ‘उत्तर’चे ‘विजू मालक’ही कार्यकर्त्यांसोबत बोलताना सहज चेष्टेत म्हणाले, ‘या सगळ्यांचं बघून मला पण खासदार होऊ वाटू लागलंय. मी पण काढून ठेवतो बघा सर्टिफिकेट’. ..अन् काय सांगावं?  शहरात जिकडं-तिकडं सध्या एकच कुजबूज. ‘विजू मालकां’कडंही म्हणे कास्ट सर्टिफिकेट तयार. हे ऐकून उगाचंच ‘शोभाताई’ लागल्यात ‘उत्तर’मध्ये कामाला.आता हे सारं कमी पडलं की काय म्हणून, ‘कमळ’वाल्यांच्या गोटात ‘ढोबळ’मानानं ‘लक्ष्मण’रावांचंही नाव कानावर पडू लागलंय. आतापर्यंतचे इच्छुक ‘बापू’ नाही तर ‘मालक’ यांचा शिक्का घेऊन फिरणारे; मात्र हे कुरनूर-मंगळवेढ्याचं नाव म्हणे ‘देवेंद्रपंतां’नी सोलापुरात ‘फॉरवर्ड’ केलेलं. आता याला स्थानिक कार्यकर्त्यांकडून किती ‘लाईक्स’ मिळतील, हा भाग वेगळा. आपण मात्र ‘कॉमेंट’ करणार नाही बुवा; कारण सोलापुरात म्हणे कुणीही निवडून येऊ शकतो. वाटल्यास खासदार वकिलांना विचारा. म्हणजे चुकून-माकून कुणाला भेटले तर !  लगाव बत्ती...

(लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

टॅग्स :Solapurसोलापूर