शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हत्तूरमध्ये गॅसचा मोठा स्फोट; चौघे गंभीर जखमी

By विलास जळकोटकर | Updated: November 27, 2023 12:13 IST

गॅस सुरु करताना घडला प्रकार : दोन लहान मुलं, एक वृद्धा, महिलेचा समावेश

सोलापूर : राहत्या घरी गॅसवरची शेगडी पेटवता असताना अचानक मोठा स्फोट होऊन चौघे गंभीररित्या भाजले. सोमवारी सकाळी ६ च्या सुमारास शहरापासून जवळच असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथे ही दुर्दैवी घटना घडली. यामध्ये एक महिला, दोन लहान मुलं आणि वृद्धाचा समावेश आहे. जखमींना ताततडीने येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सोनाली महादुलिंग बबुरे (वय- २८), आरुषी महादूलिंग बबुरे (वय ३), मलकारीसिद्ध सिद्धप्पा बबुरे (वय- १) आणि शावरसिद्ध सिद्धप्पा बबुरे (वय- ७०, सर्व रा. हत्तूर, ता. द. सोलापूर) असे भाजलेल्या चौघांची नावे आहेत.

मिळालेली माहिती अशी की, हत्तूर येथील मड्डीवस्तीत राहणाऱ्या बोळूरे कुटुंबात सोमवारी सकाळी स्वयंपाक करत असताना गॅसचा स्फोट झाला. यातील भाजलेल्या सोनाली या सकाळी सहाच्या सुमारास दररोजच्या प्रमाणे स्वयंपाक करण्यासाठी किचनमध्ये गेल्या. गॅसचे बॅटन चालू करुन पेटवताना अचानक मोठा स्फोट झाला. काय होतेय हे समजण्यापूर्वीच आगीचे लोळ उठले यात स्वत: सोनाली यांच्यासह तीन वर्षाची आरुषी आणि एक वर्षाचा मलकारीसिद्ध दोन मुलं आणि ७० वर्षाचे वृद्ध शावरसिद्ध भाजले गेले.

यातील चौघांपैकी सोनाली यांच्या चेहऱ्यास, हातास, पाठीला भाजले. तर आरुषी हिच्याही चेहऱ्यासह दोन्ही पाय भाजले आहेत. एक वर्षाच्या शावरसिद्ध याचे हात,पाय, चेहरा गंभीररित्या भाजला आहे. वृद्ध असलेले शावरसिद्ध यांना चेहऱ्याला व दोन्ही हाताला भाजले आहे.चौघांनाही तातडीने जवळच असलेल्या खासगी दवाखान्यात प्राथमिक उपचार करण्यात आले. तेथून सिलसिद्ध बबुरे यांनी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सर्वांवर उपचर सुरु असून, ते शुद्धीवर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.गॅस पाईप लिकेज असावा...सदर घटना कोणत्या कारणामुळे घडली याबद्दल कोणालाही काही माहिती नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगताना गॅसचा पाईप लिकेज झाल्यानेच हा प्रकार घडला असावा, अशी चर्चा प्रत्यक्षदर्शीमधून सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूर