शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

हुडहुडीनं सोलापूर पुन्हा गारठलं !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 14:39 IST

सोलापूर : गत महिन्यात सोलापूरकरांना हुडहुडीनं त्रस्त केलेल्या थंडीनं नव्या वर्षात पुन्हा डोकं वर काढलं आहे. यामुळे थंडी-तापानं फणफणणाºया ...

ठळक मुद्देगेल्या महिन्यात २९ आणि ३० डिसेंबर रोजी थंडीचा निचांकी परिणाम जाणवलागेल्या चार-पाच दिवसांपासून सातत्याने तापमानाचा पारा खाली-वर होतो आहेसोमवारी येथील हवामान खात्याकडे १५.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले

सोलापूर: गत महिन्यात सोलापूरकरांना हुडहुडीनं त्रस्त केलेल्या थंडीनं नव्या वर्षात पुन्हा डोकं वर काढलं आहे. यामुळे थंडी-तापानं फणफणणाºया रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. शहर-जिल्ह्यातील दवाखान्यांमध्ये अशा रुग्णांची उपचारासाठी गर्दी दिसू लागली आहे. सोमवारी येथील हवामान खात्याकडे १५.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

गेल्या चार-पाच दिवसांपासून सातत्याने तापमानाचा पारा खाली-वर होतो आहे. पहाटे आणि रात्री बोचरी थंडी जाणवू लागल्याने थंडीतापाच्या रुग्णांची संख्या वाढू लागल्याचे रुग्णालयाच्या गर्दीवरुन दिसून येत आहे. थंडीचा हा असर दिवसाही जाणवू लागला आहे. सूर्याचं दर्शनही विरळ होऊ लागलं आहे. रविवारी दिवसभर भिरभिरणाºया वाºयामुळे अनेक रुग्णांनी घर सोडलं नाही. अस्थमाचा आजार असणाºया रुग्णांना याची झळ अधिक पोहोचू लागली आहे. शिशू बालकांचीही काळजी घ्यावी. गरम कपड्यांचा वापर करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. 

गेल्या महिन्यात २९ आणि ३० डिसेंबर रोजी थंडीचा निचांकी परिणाम जाणवला. सलग दोन दिवसांच्या या परिणामामुळे अनेक रुग्णालयांमध्ये थंडीतापाने त्रस्त रुग्णांची संख्या अधिक जाणवली होती. गेल्या चार दिवसांतल्या थंडीमुळे नागरिकांशिवाय याचा थेट परिणाम पिकांवरही जाणवू लागला आहे. या वातावरणाचा प्रामुख्याने फळपिकांना फटका बसतो असे शेतकºयांमधून सांगण्यात येत आहे. यंदा पावसाने ओढ दिली तरी थंडीची तीव्रता मात्र अधिक जाणवू लागल्याने चिंता व्यक्त होऊ लागली आहे. पाऊसमान नसल्याने अनेक ठिकाणी ज्वारी काढणीची लगबग सुरु आहे. अशातच थंडीची तीव्रता जाणवू लागल्याने शेतकरी, मजूर वर्गाचीही तारांबळ होऊ लागली आहे. 

स्वाईन फ्लूची भीती- एकीकडे थंडीचा गारठा वाढलेला असताना स्वाईन फ्लूची लक्षणेही रुग्णांमध्ये जाणवू लागल्यामुळे शहर-जिल्ह्यातील नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. आधीच निसर्गाच्या प्रकोपानं नाडल्या गेलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना दवाखान्याच्या वाºया कराव्या लागत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांनी खबरदारी घेण्याचा सल्ला देताना थंडीतापाची लक्षणे आढळताच नजीकच्या आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घेण्याचे आवाहन केले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, शासकीय रुग्णालयात पुरेसा औषधसाठा उपलब्ध असल्याचेही सांगण्यात आले.

टॅग्स :SolapurसोलापूरTemperatureतापमान