शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बाळंतिणीला दाखल करून घेण्यास हॉस्पीटलचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 12:06 IST

सोलापुरातील धक्कादायक घटना: आयुक्त अविनाश ढाकणे गेल्यानंतर आरोग्य व्यवस्था पुन्हा कोलमडली

ठळक मुद्देचांगल्या सुविधेमुळे शहर आणि परिसरातील झोपडपट्टीत राहणाºया अनेक गरीब महिलांना आधार मिळत आहेगेल्या काही दिवसांपासून प्रसूतिगृहातील कर्मचाºयांची अरेरावी सुरू झाल्याच्या तक्रारी वाढल्या

सोलापूर : प्रसूतीसाठी डफरीन हॉस्पिटलमध्ये आलेल्या एका बाळंतिणीला कर्मचाºयांनी आल्यापावली परत पाठविल्याचा प्रकार सोमवारी रात्री घडला. 

शेळगी परिसरात राहणारी विवाहिता त्रास होऊ लागल्याने सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमाराला वडिलांसमवेत उपचारासाठी डफरीन हॉस्पिटलमध्ये आली. त्यावेळी हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर असलेल्या कर्मचाºयांनी तिला अ‍ॅडमिट करून घेण्यास नकार दिला. 

वजन कमी आहे, डिलिव्हरीच्या वेळी त्रास होईल, आता डॉक्टर नाहीत, अशी कारणे सांगून तिला परत पाठविले. विशेष धक्कादायक बाब म्हणजे त्या विवाहितेने प्रसूतीपूर्व सर्व तपासण्या डफरीन हॉस्पिटलमध्येच केल्या होत्या. असे असतानाही कर्मचाºयांनी तिला दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे नाईलाजाने त्या विवाहितेला रात्री साडेअकरा वाजता खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे नॉर्मल डिलिव्हरी झाली, मात्र डफरीनमधील कर्मचाºयांनी दिलेल्या वागणुकीबाबत त्या विवाहितेच्या पित्याने संताप व्यक्त केला. 

महापालिकेच्या प्रसूतिगृहातील दुरवस्थेमुळे शासकीय रुग्णालयाच्या  सेवेवर ताण येत होता. त्यामुळे महापालिकेची आरोग्य सेवा तत्पर करावी, यासाठी आम्ही मदत करू, असा प्रस्ताव तेथील डॉक्टरांनी दिला होता. 

त्यावर तत्कालीन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी महापालिकेची प्रसूतिगृहे सुधारण्यासाठी पुढाकार घेतला. रामवाडी, डफरीन, बॉईज प्रसूतिगृहाचे नूतनीकरण करून सुविधा उपलब्ध करून दिल्या. १८ वर्षांनी डफरीनमधील शस्त्रक्रिया विभागातील नळाला पाणी आले होते. या सुधारणेनंतर महापालिकेच्या दवाखान्यात नॉर्मल प्रसूती होण्याचे प्रमाण वाढल्याचा दावा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी केला होता.  

चांगल्या सुविधेमुळे शहर आणि परिसरातील झोपडपट्टीत राहणाºया अनेक गरीब महिलांना आधार मिळत आहे. पण पुन्हा गेल्या काही दिवसांपासून प्रसूतिगृहातील कर्मचाºयांची अरेरावी सुरू झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

बाळंतीणला दाखल करून न घेता परत पाठविणे ही बाब अत्यंत गंभीर आहे. महापालिकेची आरोग्य सेवा गरिबांसाठी आहे. मी याबाबत लवकरच बैठक घेऊन या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यास भाग पाडेन.-राजेश काळे, सभापती, आरोग्य समिती 

मी रजेवर आहे. सर्व कर्मचाºयांना रुग्णांची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या डॉ. सोडल यांच्यावर डफरीन हॉस्पिटलची जबाबदारी आहे. काय प्रकार घडला याची मी त्यांच्याकडे चौकशी करेन.-डॉ. संतोष नवले, आरोग्य अधिकारी

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाHealthआरोग्य