शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
3
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
4
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
5
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
6
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
7
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
8
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
9
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
10
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
11
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
12
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
13
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
14
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
15
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
16
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
17
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
18
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
19
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
20
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा

अकलूजमधील त्या दांपत्याच्या प्रामाणिकपणामुळे परप्रांतीय पोलीसही गहिवरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 13:05 IST

चार वर्षांनंतर स्वगृही; सांभाळकर्त्यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी मुलीला जन्मदात्याच्या केले स्वाधीन

ठळक मुद्देचित्रपटाला शोभेल अशी घटना अकलूज येथील तुपे दांपत्याची रेश्मा शंकर आयवळे असे चार वर्षांपूर्वी यात्रेत हरवलेल्या मुलीचे नावअकलूज पोलिसांच्या तपासामुळे परराज्यातून हरवलेल्या मुलीच्या आईवडिलांशी भेट

राजीव लोहकरे

अकलूज: आता ती सात वर्षांची झालेली़़़चार वर्षांपूर्वी कर्नाटकातील चिंचणी येथे मायाक्कादेवी यात्रेत सापडलेल्या मुलीला जन्मदाते मिळाले...पण इथल्या संस्कृतीत, संस्कारांत मिसळलेल्या रेश्माला सांभाळकर्ते सोडताना कंठ दाटून आला.. अकलूजमधील कुटुंबाने पाणावलेल्या डोळ्यांनी तिच्या पालकांकडे सोपविले़़़यावेळी त्या मुलीसह पोलिसांच्याही डोळ्यात अश्रू तरळत राहिले.

चित्रपटाला शोभेल अशी घटना अकलूज येथील तुपे दांपत्याची आहे़ रेश्मा शंकर आयवळे असे चार वर्षांपूर्वी यात्रेत हरवलेल्या मुलीचे नाव आहे़ रविवारी सायंकाळी अकलूज पोलीस ठाण्यात प्रकार पाहायला मिळाला़ अकलूज पोलिसांच्या तपासामुळे परराज्यातून हरवलेल्या मुलीच्या आईवडिलांशी भेट झाली.

आजच्या काळात मुलगी पराया धन म्हणून तिचे व्यवस्थित संगोपन केले जात नाही़ कधी-कधी गर्भातच भ्रूणहत्या केली जाते. परंतु चिंचणी (कर्नाटक)येथील मायाक्कादेवीच्या यात्रेत आई-वडिलापासून ताटातूट झालेल्या चिमुकलीचे पोटच्या मुलीप्रमाणे संगोपन केले़ तुपे कुटुंब व तपासात सापडलेल्या मुलीचा आनंदाने स्वीकार करणाºया आयवळे कुटुंबाविषयी सविस्तर वृत्त असे: सन २०१५ साली शंकर भगवान आयवळे (रा.कुरूंदवाड, ता.वाळवा, जि. सांगली) हे सहकुटुंब चिंचणी येथे मायाक्कादेवीच्या यात्रेसाठी गेले होते. त्यावेळी झालेल्या प्रचंड गर्दीत त्यांची ४ वर्षांची मुलगी रेश्मा बांगडीआळीतून हरवली. त्यांनी फार शोधले. जवळच्याच कुर्ची या पोलीस ठाण्यामध्ये मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली. त्याच दिवशी अकलूज येथील हरीभाऊ तुपे हेही सहकुटुंब देवीच्या यात्रेसाठी आले होते.

चार वर्षांची रेश्मा रडत आईवडिलांचा शोध घेत असताना हरीभाऊ तुपे यांना सापडली. त्यांनी तिच्याकडे चौकशी केली असता तिला फक्त रेश्मा शंकर एवढेच नाव सांगता येत होते. त्यावेळी तुपे यांनी बंदोबस्तावर असणाºया पोलिसांना त्या मुलीची माहिती दिली. परंतु गर्दी प्रचंड असल्यामुळे पोलिसांनी लक्ष दिले नाही. लहानग्या मुलीला गर्दीत एकटे सोडण्यापेक्षा तुपे यांनी तिला अकलूजला आणण्याचे उचित समजून तिला घरी आणले. तिचा पोटच्या गोळ्याप्रमाणे सांभाळ केला. मुलगी हरवल्याची माहिती कर्नाटक पोलिसांकडून महाराष्ट्रातील सर्व पोलीस ठाण्यांना पोहोच झाली होती.परंतु तपासात चार वर्षे निघून गेली. तोपर्यंत ती तुपे यांच्या घरी रूळली. तुपे यांनी तिला शाळेतही घातले. 

कुर्ची पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद आढळली- अकलूजचे उपअधीक्षक निरज राजगुरू यांना खबºयाकडून एक हरवलेली मुलगी अकलूज येथे सांभाळली जात असल्याचे सांगितले. त्यांनी तुपेला बोलावून घेतले़ चौकशीत सांभाळकर्त्यांनी मुलगी चिंचणी मायाक्का यात्रेत सापडल्याचे सांगितले. राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी पोलीस हवालदार रामचंद्र चौधरी, पोलीस नायक संदीप रोकडे व सुभाष गोरे यांचे एक पथक नेमले़ तपास कामासाठी कर्नाटकात पाठवले. कुर्ची पोलीस ठाण्यात सन २०१५ साली तक्रार दाखल झाल्याचे पुढे आले. त्यात रेश्माच्या पालकांचा पत्ता व त्यावेळचा तिचा फोटो, कपड्याचे वर्णन व अंगावरील खुणा नोंदवल्या होत्या.

...त्यांना पाहताच रेश्मा गोंधळली - कर्नाटक पोलिसांशी संवाद साधताना भाषेची अडचण निर्माण झाली. परंतु हवालदार चौधरी यांनी मुलीच्या पालकांचा शोध घेऊन त्यांना रविवारी अकलूज येथे आणले. पालकांनी आपली मुलगी ओळखली. परंतु पुढे एक अडचण निर्माण झाली. चार वर्षांपासून सांभाळणाºया तुपे यांनाच ती आई-वडील समजत होती. आज आपल्या खºया आईवडिलांना पाहताच तिच्या चेहºयावर संभ्रमावस्था निर्माण झाली. कोणाकडे जावे हे तिला समजत नव्हते. यावेळी जन्मदाते आयवळे दांपत्याला मुलगी सापडल्याने आनंद झाला होता़ दुसरीकडे सांभाळ करणाºया तुपे दांपत्यास अश्रू अनावर झाले़ हा सगळा प्रकार पाहून अकलूज पोलिसांचेही ङोळे पाणावले. शेवटी रेश्माला तिच्या आईवडिलांकडे सुपूर्द करण्यात आले. याकामी कर्नाटक पोलिसांनीही मदत केली.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसKarnatakकर्नाटक