शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

पतसंस्थांच्या पिग्मी कलेक्शनला फटका; चाळीस कोटींची बचत थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 08:30 IST

कोरोना व्हायरस लॉकडाऊनचा परिणाम; वसुलीवरही परिणाम, संस्थांबरोबरच एजंटाचेही नुकसान

ठळक मुद्देकलेक्शन थांबल्यामुळे बँकांची कर्जवसुली देखील थांबली तब्बल ४० कोटी रुपयांपेक्षा जास्त बचत ही थांबली संस्थांबरोबरच एजंटाचेही नुकसान झाले आहे़

शहाजी फुरडे-पाटील 

बार्शी : कोरोना व्हायरसने देशभर आपली पाळेमुळे पसरली आहेत.  त्याला रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. या लॉकडाऊनमुळे देशाचीच नव्हे तर जागतिक अर्थव्यवस्था धोक्यात आली़ सर्वच क्षेत्राला त्याचा मोठा फटका बसला़ असाच एक उद्योग असलेल्या ४० बँका, पतसंस्था, फायनान्स व मल्टीस्टेट यांची पिग्मी (दैनंदिन ठेव) गोळा करणाºया शहर व तालुक्यातील सुमारे ३०० एजंटांना फटका बसला आहे़ या काळात सुमारे चाळीस कोटी रुपये कलेक्शन बुडाले आहे़ 

बार्शी शहर हे सुरुवातीपासूनच व्यापारी शहर म्हणून ओळखले जाते़ याठिकाणी केवळ शहर व तालुकाच नव्हे तर निम्मा उस्मानाबाद जिल्हा, अहमदनगरचा काही भाग आदी ठिकाणाहून किराणा व इतर माल खरेदीसाठी नागरिक व छोटे-मोठे व्यापारी येतात़ त्यामुळे शहरात मोठी आर्थिक उलाढाल होते़ बार्शी शहरात १३ पतसंस्था, १५ सहकारी बँका, तीन मल्टीस्टेट सोसायटी, ४ निधी फायनान्स व इतर छोटी-मोठी फायनान्स अशा चाळीस पेक्षा जास्त संस्था आहेत़ या संस्थांच्या माध्यमातून कर्जदार व बिगरकर्जदार खातेदारांकडून दररोज सुमारे तीनशे एजंटाच्या माध्यमातून कलेक्शन केले जाते.

 कित्येक छोटे दुकानदार हे आपल्या रोजच्या व्यवसायातून बचत म्हणून देखील रोज शंभर रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंत पिग्मी भरत होते़ तर काही व्यावसायिकांनी खेळते भांडवल म्हणून कर्ज घेतले आहे़ ते या पिग्मीच्या माध्यमातून बँकांकडे भरत असतात़ कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या स्थितीमुळे अन्य क्षेत्राप्रमाणेच या क्षेत्रावर संकट ओढावले आहे. सामान्यजनांची तर मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. लवकरात लवकर  हे संकट दूर व्हावे यासाठी गावोगावी प्रार्थना होऊ लागली आहे.

दैनंदिन रोजीरोटीवर परिणाम- सध्या जनता कर्फ्यूपासून हॉस्पिटल, मेडिकल, किराणा व भाजीपाला वगळता सर्व दुकाने बंद आहेत़ त्यामुळे या हातावरचे पोट असणाºया म्हणजे कलेक्शन केले तरच चार पैसे मिळणारा व एजंट वर्ग अडचणीत आला आहे़ कित्येक एजंटाचे एका दिवसाचे कलेक्शन पाच हजारांपासून वीस ते पन्नास हजारांपर्यंत आहे़ त्यांना काही संस्था दीड टक्क्यापासून ते तीन टक्क्यापर्यंत कमिशन देतात़ हे कलेक्शन थांबल्यामुळे बँकांची कर्जवसुली देखील थांबली आहे़ त्यामुळे संस्थांचा एनपीए ही वाढण्याचा धोका आहे़ 

सर्व पतसंस्था, बँका, मल्टीस्टेट, फायनान्स यांचे मिळून शहर व तालुक्यात दररोज सव्वा कोटी रुपयापेक्षा जास्त संकलन होत होते; मात्र गेल्या पस्तीस दिवसांपासून बंद असल्यामुळे तब्बल ४० कोटी रुपयांपेक्षा जास्त बचत ही थांबली आहे़ यामुळे संस्थांबरोबरच एजंटाचेही नुकसान झाले आहे़ - मिलिंद कांबळे, सरव्यवस्थापक, भगवंत मल्टीस्टेट बार्शी.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याbankबँकBanking Sectorबँकिंग क्षेत्रCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस