शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

लॉकडाऊनचा फटका; ध्यानी ना मनी..संकटात सापडला ‘कुंकवाचा धनी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 13:03 IST

केमच्या कुंकूकारखान्यातील ३०० कामगारांवर बेकारीची कुºहाड

ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये देशभरातील मंदिरे बंद आहेत, यंदा चैत्र महिन्यातील यात्रा, उत्सव साजरे करता आले नाहीतपंढरपूरची आषाढी वारी यंदा नाही़ यामुळे कुंकू कारखानदार आर्थिक संकटात आहेतकुंकू कारखानदारांना तीन महिन्यांचे वीज बिल, वर्षभराच्या विजेचा स्थिर आकार, कर्जाचे व्याज माफ करावे

नासीर कबीरकरमाळा : कोरोनामुळे देवदेवतांचे मंदिर बंद झाले़ यामुळे जगप्रसिध्द केमचे कुंकू संकटात सापडले आहे. कोरोनामुळे अडीच महिन्यांपासून कुंकू कारखानदारांचा व्यवसाय ठप्प झाला आहे़ कारखान्याच्या मालकांना आर्थिक फटका बसला असून, ३०० कामगारांवर बेकारीची कुºहाड कोसळली आहे.

सौभाग्याचं लेणं म्हणून केमचे कुंकू जगप्रसिध्द आहे. हिंदू संस्कृतीमध्ये कुंक वाला महत्त्व आहे. केम (ता. करमाळा) येथे कुंकू चे २२ कारखाने आहेत़ येथे कुंकू, गुलाल, बुक्का तयार केला जातो. देवदेवतांच्या यात्रा आणि उत्सवात कुंकू, गुलाल, बुक्का मोठ्या प्रमाणात वापरण्याची परंपरा हजारो वर्षांपासून आजही सुरू आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात २२ मार्चपासून लॉकडाऊन सुरू होताच देवदेवतांच्या यात्रा, उत्सवावर बंदी घालण्यात आली़ मंदिरे कुलूपबंद झाली़ त्याचा परिणाम चैत्र महिन्यात पंढरपूर, तुळजापूर, शिखर शिंगणापूर, येरमाळा, ज्योतिबा, खंडोबा व गावोगावच्या यात्रा यंदा होऊ शकल्या नाहीत. 

महाराष्ट्रासह राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, असाम, दिल्ली, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यातील देवतांच्या उत्सवात गुलाल, बुक्का व कुंकू याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे़ केम येथील कारखान्यातून सीझनमध्ये ८०० मे. टन गुलाल, बुक्का व कुंकू पाठविला जातो. लॉकडाऊनमुळे अडीच महिन्यांपासून कुंकू ची कारखानदारी बंद आहे. कारखान्यात काम करणाºया ३०० कामगारांचा रोजगार बुडाला आहे. या काळातही विजेचा स्थिर आकाराचा भुर्दंड सोसावा लागत आहे. बँका, पतसंस्थांकडून घेतलेले कर्ज आणि व्याजाचा भुर्दंड सोसावा लागत आहे़ सीझनमध्येच कुंकू कारखानदार आर्थिक संकटात सापडला आहे़ लॉकडाऊनमध्ये सवलत दिली असून दोन दिवसापासून कारखाने सुरू आहेत़ जिल्हा व राज्यबंदी असल्याने तयार झालेला माल कुठेही पाठवता येत नसल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे़ 

आमचं गाºहाणं ऐका..- लॉकडाऊनमध्ये देशभरातील मंदिरे बंद आहेत़ यंदा चैत्र महिन्यातील यात्रा, उत्सव साजरे करता आले नाहीत. पंढरपूरची आषाढी वारी यंदा नाही़ यामुळे कुंकू कारखानदार आर्थिक संकटात आहेत. यातून सावरण्यासाठी कुंकू कारखानदारांना तीन महिन्यांचे वीज बिल, वर्षभराच्या विजेचा स्थिर आकार, कर्जाचे व्याज माफ करावे, असं गाºहाणं मांडत शासनाकडे  कुंकू कारखानदार मनोज सोलापूरे यांनी केली आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरbusinessव्यवसायkarmala-acकरमाळा