शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गणपतीपुढे नाचणारा झाला ‘हीपहॉप’ स्टार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 16:14 IST

गॅदरिंगमध्ये नाकारले; मुंबईत जाऊन झोपडपट्टीत राहिला, दीड वर्षाने मिळविले यश

ठळक मुद्देललितने त्यांची भेट घेऊन हीपहॉपमध्ये करिअर करण्याची इच्छा व्यक्त केलीसन २0१२ मध्ये सोलापुरात एका कार्यशाळेसाठी प्रशिक्षक कार्तिक राजा आले होतेराजू स्वामी यांचे भवानीपेठेत मेडिकल दुकान आहे. त्यांचा मुलगा ललित. शिक्षण बीए पर्यंत झालेले

राजकुमार सारोळे 

सोलापूर : शेळगीतील चाकोते नगरातील गणपती मंडळापुढे नाचणारा ललित राजू स्वामी हा हीपहॉप स्टार बनला आहे. सहावीत असल्यापासून नाचण्याचे वेड लागलेल्या ललितला शाळेत गॅदरिंगमध्ये नाकारण्यात आले. याचा राग मनात धरून आपण एक दिवस स्टार बनायचे हे स्वप्न घेऊन तो मुंबईत गेला. दीड वर्षे झोपडपट्टीत राहून भटकत राहिला. अखेर त्याला हीपहॉप डान्स तांत्रिक शिक्षण देणारी संस्था मिळाली अन् तो आता वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न पाहत आहे.

राजू स्वामी यांचे भवानीपेठेत मेडिकल दुकान आहे. त्यांचा मुलगा ललित. शिक्षण बीए पर्यंत झालेले. त्याला लहानपणापासून नाचण्याचे वेड लागले. शेळगीतील चाकोतेनगरातील गणपती मंडळासमोर घेण्यात येणाºया डान्स स्पर्धेत त्याने प्रथम भाग घेतला.  टीव्हीवर मायकल जॅक्सनचा डान्स पाहून त्याचे हे वेड आणखी वाढले. सन २0१२ मध्ये सोलापुरात एका कार्यशाळेसाठी प्रशिक्षक कार्तिक राजा आले होते.

ललितने त्यांची भेट घेऊन हीपहॉपमध्ये करिअर करण्याची इच्छा व्यक्त केली. दहावीनंतर ये असे त्यांनी सांगितले. हे डोक्यात ठेवून दहावीनंतर तो मुंबईत गेला व  स्कूलसाठी दीड वर्षे फिरला. किंग्जमध्ये त्याची प्रॅक्टिस बघून सीजीन रमेश, कार्तिक प्रियदर्शनी यांनी संधी दिली. किंग्ज युनायटेड ज्युनिअर टीममध्ये सहभागी केले. या टीमचे अँकरिंग चांगल्याप्रकारे केल्याने आता त्याच डान्सस्कूलमध्ये ललित शिक्षक म्हणून काम करत आहे. वर्ल्ड चॅम्पियन होण्याचे स्वप्न असल्याचे त्याने सांगितले.

ललितने मुंबईत किंग्ज युनायटेड डान्स स्कूलमध्ये प्रवेश घेतला. तेथे तांत्रिक प्रशिक्षण घेऊन वर्ल्ड चॅम्पियनची तयारी सुरू केली आहे. किंग्जच्या स्क्वॉड ज्युनिअर टीमचे तो अँकरिंग करतो आहे. कोलकात्ता, दिल्ली येथे त्याचे शो झाले. कारगिल दिनाच्या शोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती होती.

ललितला डान्सचे लहानपणापासून वेड आहे. त्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष झाल्याने आई विजयालक्ष्मीला चिंता वाटत होती. शाळेत गॅदरिंग प्रवेश नाकारल्यावर शिक्षकांसमोर त्याने डान्स केला. मुंबईत जाऊन झोपडपट्टीत राहिला.                     - राजू स्वामी

मनात पॅशन असेल तर काहीच अशक्य नाही. हीपहॉपचे प्रशिक्षण मिळण्यासाठी मी बरेच फिरलो. प्रयत्नानंतर यश मिळाले. अभिनेता शाहरूख खानबरोबर काम करण्याची संधी मिळाली. आता करिना कपूर, बॉस्को मॉर्टिस, रफ्तार यांच्यासमोर काम करतो आहे.    - ललित स्वामी

टॅग्स :Solapurसोलापूरmusicसंगीत