शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

उच्च विचारशक्ती आणि आत्मविश्वास...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 13:28 IST

लोक देश आणि समाजाची अनमोल संपत्ती असतात. म्हणून नेहमी आपले मन मजबूत ठेवा.

 

आपण यापैकी कसे आहात आणि कसे बनू इच्छिता, ते ठरविण्याचा अधिकार आपल्याला आहे. कारण, जीवनात प्रत्येकाला एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे, आपण साहसी बनू इच्छिता की भित्रे? सकारात्मक विचार करणारा कधीच भित्रा बनू शकत नाही. कारण, त्याचा स्वत:वर, जीवनावर आणि ईश्वरावर विश्वास असतो. ते उच्च विचारशक्ती आणि आत्मविश्वासाने आपले काम करतात. असे लोक आपल्यासाठी काम करतातच पण त्यांच्यामुळे देश आणि समाजाची प्रगती होत असते. असेच लोक देश आणि समाजाची अनमोल संपत्ती असतात. म्हणून नेहमी आपले मन मजबूत ठेवा. कारण, ए. पी. जे. अब्दुल कलाम, धीरूभाई अंबानी, अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडूलकर या महान लोकांनी जन्म घेतला नसता तर एवढे मोठे कर्म त्याच्या हातून झाले नसते.

एखाद्या शास्त्रीय नर्तिकेचा अपघातात एक पाय निकामी होऊनही तिची नृत्याची जिद्द कमी होत नाही. ती नकली पाय बसवून व्यासपीठावर नाचते. एखाद्या क्रिकेटपटूने चांगला खेळ केला तरीही त्याला संघाबाहेर जाण्याचा रस्ता दाखविला जातो. परंतु, तो हार न मानता पुन्हा संघात दाखल होतो. एका महान चित्रपट निर्मात्याच्या महत्त्वाकांक्षी चित्रपटाला दर्शकांनी नकार दिल्यानंतर तो पुन्हा एक चित्रपट निर्माण करतो आणि तो चित्रपट इतिहास घडवितो किंवा मैलाचा दगड ठरतो.असे नेहमीच होते. कारण जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक म्हणचे कमजोर मनाचे आणि दुसरे म्हणजे मजबूत मन असलेले. कमजोर मन असणार्‍या लोकांमध्ये संकटाचा सामना करण्याचे धाडस नसते. त्यामुळे ते अधिकधिक कमजोर होऊन तक्रार करणे, रडणे यामुळे अयशस्वी होतात. मात्र आपल्या अपयशाचे खापर दुसर्‍याच्या माथ्यावर फोडण्यासाठी कारणे शोधतात.मजबूत मन असणारे लोक असे नसतात. ते प्रत्येक संकटाचा धैर्याने सामना करतात. टीकाकारांनी केलेली टीका त्यांचे मन बदलू शकत नाही. ते आपली हिंमत गमावत नाहीत, ते तक्रार करत नाहीत. ते प्रत्येक घटनेचा सकारात्मक बाजूने विचार करून एक दिवस यशस्वी होतात. कारण, त्यांच्यामध्ये संकटाच्याकाळी आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षा असते. ते जीवनातील प्रत्येक आव्हानाचा अधिकाधिक फायदा घेण्याचा प्रयत्न करत असतात.

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक