शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

आगामी निवडणुकीसाठी महाआघाडीची प्रक्रिया सुरू- सुशीलकुमार शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 11:07 IST

सोलापूर : आगामी निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी महाआघाडी स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यातील एका समितीमध्ये मी सहभागी आहे. ...

ठळक मुद्दे उमेदवार ठरविण्याच्या प्रक्रियेवर राहुल गांधींचा प्रभाव असेल - शिंदेनिवडणुकीत फायदा आणि तोट्याचा विचार नसतो - शिंदेसमोर कोणताही उमेदवार असला तरी लढावेच लागेल - शिंदे

सोलापूर : आगामी निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी महाआघाडी स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यातील एका समितीमध्ये मी सहभागी आहे. राजकीय अ‍ॅडजेस्टमेंट म्हणून मनसे आणि एमआयएमसारख्या भिन्न विचारसरणीच्या पक्षांनाही एकत्र आणायला पाहिजे, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.

पुढे बोलताना सुशिलकुमार शिंदे यांनी प्रकाश आंबेडकरांच्या आघाडीशी दोस्ताना करण्याच्या मुद्यावर भाष्य केले. आंबेडकर हे धर्मनिरपेक्ष आहेत. निवडणुका जिंकण्याचा त्यांचाही प्रयत्न आहे. शिवाय, त्यांना आमच्याबरोबर यायचे आहे आणि आमचीही त्यांना बरोबर घेण्याची भूमिका आहे, असे शिंदे म्हणाले.

लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीबाबत विचारले असता ते म्हणाले की, उमेदवार ठरविण्याच्या प्रक्रियेवर राहुल गांधींचा प्रभाव असेल. माझ्या उमेदवारीचा निर्णयही पक्षश्रेष्ठीच घेतील; पण उमेदवार कोणीही असला तरी मी मात्र फिरतोय. निवडणुकीत फायदा आणि तोट्याचा विचार नसतो. समोर कोणताही उमेदवार असला तरी लढावेच लागेल, असेही एका प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी सांगितले.अनौपचारिक गप्पांमध्ये राष्टÑीय प्रश्नांकडे शिंदे यांचे लक्ष वेधले.

पावणेपाच वर्षांतील मोदी सरकारच्या काळाकडे एक नागरिक म्हणून आपण कसे पाहता, या प्रश्नावर ते भरभरून बोलले. स्मरणशक्तीला थोडेसे आवाहन करत, मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर केलेले विधान उद्धृत केले... त्यावेळी मी पत्रकारांना म्हणालो होतो, ‘वेट फॉर थ्रीर इयर्स, इट विल कोलॅप्स’ अगदी तसेच झाले. सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले. सर्व व्यवस्था कोसळू लागल्या. मोदींनी सत्तेवर येण्यापूर्वी अनेक आश्वासने दिली होती; पण ती कुठे पूर्ण झालीत? सारीच फसगत. जनता पार्टीच्या सरकारमध्ये जनसंघ सहभागी होता. तेव्हा त्या पक्षाने पायात पाय घालून सरकार पाडले. वाजपेयींच्या सत्ताकाळात शायनिंग इंडियाचा नारा दिला; पण देशाची तशी स्थिती नव्हतीच. त्यामुळे मोदी सरकारचीही वाटचाल तशीच राहणार, हे ओळखूनच मी सरकार ‘कोलॅप्स’ होईल, असे म्हणालो होतो, शिंदे सांगत होते. 

टॅग्स :SolapurसोलापूरSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेElectionनिवडणूकPoliticsराजकारण