शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अहो आश्चर्यम्; तपास लागेना म्हणून करमाळ्यात साजरा केला चोरीचा वर्षपूर्ती दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 12:54 IST

चोरट्याने घर फोडून केली होती चोरी; पोलीसांच्या कामगिरीवरही व्यक्त केली नाराजी

ठळक मुद्दे- करमाळा शहरातील भवानी नाक्यावरील सोसायटीत झाली होती चोरी- चोरी होऊन वर्ष लोटले तरी तपास करण्यास पोलीसांना आले अपयश- चोरीच्या वर्षपुर्ती कार्यक्रमाची करमाळा शहरात जोरदार चर्चा

करमाळा : गतवर्षी झालेल्या चोरीला १८ फेब्रुवारीच्या दिवशी वर्ष होत असताना तपास न लागल्याने करमाळ्यात बन्सी यादव नामक तक्रारकर्त्यांनी सोमवारी पूर्वसंध्येला वर्षपूर्ती दिन साजरा करून पोलीस खात्याचा निषेध केला. वर्ष लोटले तरी तपास लागत नसल्याबद्दल त्यांनी नापसंती व्यक्त केली.

करमाळा शहरातील भवानी नाक्यावरील विकी हौसिंग सोसायटीत राहणारे कैलास बन्सी यादव हे आपल्या घरासमोरील शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये बँक आॅफ इंडियाचे ग्राहक सुविधा केंद्र चालवितात. १८ फेब्रुवारी २०१९ रोजी ते सकाळी १० वाजता घराला कुलूप लवून ग्राहक सेवा केंद्रात गेले. दुपारी चोरट्याने घर फोडून कपाटातील ४३ हजार रुपये किमतीचे दागिने चोरुन नेले. या प्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांत भादंवि ४५४ अन्वये गुन्हा दाखल झाला.

चोरी होऊन वर्ष उलटत असताना वर्षभरात चोरीचा तपास लागला नाही. वर्षभरात एकदाही पोलिसांनी आपणास तपासासंदर्भात कधी विचारणा केली नाही. उलट मी वारंवार पोलीस ठाण्यात हेलपाटे मारले, पण कुणीच लक्ष दिले नाही. याबद्दल मला आजही आश्चर्य वाटते म्हणून मी या चोरीच्या घटनेची वर्षपूर्ती तीव्र दु:ख व्यक्त करून करीत असल्याचे कैलास बन्सी यादव यांनी सांगितले.दरम्यान, वर्ष उलटून गेले तरी चोरीचा तपास न लागल्याने बन्सी यादव यांनी अवलंबविलेल्या या चोरीच्या वर्षपूर्ती उपक्रमाची शहरभर एकच चर्चा सुरू होती. चोरीचा गुन्हा नोंदल्यानंतर पोलिसांकडून साधी चौकशी करण्याचेही सौजन्य दाखवले  नाही याबद्दल या वर्षपूर्ती निषेध उपक्रमानंतर चर्चा सुरु झाली आहे. 

 

टॅग्स :SolapurसोलापूरThiefचोरkarmala-acकरमाळाSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस