शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

शासनाच्या परवानगीनंतरच सोलापुरातील हाेम मैदान मंदीर समितीच्या ताब्यात देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 19:28 IST

आयुक्त पी. शिवशंकर : नंदीध्वज मार्ग दुरुस्तीसाठी दिले निवेदन

साेलापूर : ओमायक्राॅनच्या धर्तीवर ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांच्या यात्रेला परवानगी द्यायची की नाही याबद्दल शासनाकडे मार्गदर्शन मागविले आहे. शासनाकडून निर्देश आल्यानंतर हाेम मैदान यात्रा कमिटीच्या ताब्यात देणे आणि इतर विषयांवर कार्यवाही हाेईल, असे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी गुरुवारी ‘लाेकमत’ला सांगितले.

गड्डा यात्रेसाठी हाेम मैदान ताब्यात द्यावे असे पत्र सिद्धेश्वर देवस्थान यात्रा समितीचे चेअरमन भीमाशंकर पटणे, ॲड. बाळासाहेब भाेगडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी अतिरिक्त आयुक्त विजय खाेराटे यांना दिले. यंदाच्या यात्रेच्या कामकाजास १५ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. हाेम मैदान येथे यात्रेतील काही धार्मिक विधी पार पडतात. करमणुकीची साधने, कृषी प्रदर्शन यासह विविध दुकाने असतात. यंदा मैदानावर माेठे साहित्य पडले आहे. मैदानावर गवत वाढले आहे. अशा परिस्थितीत यात्रा भरविणे अडचणीचे हाेणार आहे. हे साहित्य अन्यत्र हलवून मैदान स्वच्छ करावे, अशी मागणी पटणे यांनी केली.

दरम्यान, आयुक्त पी. शिवशंकर म्हणाले, ओमायक्राॅनचा धाेका पाहता शासनाकडून यात्रेसंदर्भात मार्गदर्शन आवश्यक आहे. शहरातील काेराेना नियंत्रणात आहे. यासंदर्भातील अहवालासह प्रस्ताव शासनाकडे पाठविणार आहाेत. शासनाचे मार्गदर्शन येताच कार्यवाही सुरू हाेईल.

---

नंदीध्वज मिरवणूक मार्ग दुरुस्त करा

१२ ते १५ जानेवारी या कालावधीत सिद्धेश्वरामेश्वरांनी स्थापन केलेल्या ६८ लिंगाच्या प्रदक्षिणेसाठी व इतर धार्मिक विधिकरीता मिरवणुका निघतात. या मिरवणूक मार्गावर सध्या खड्डे पडले आहेत. शिवाय या मार्गावर स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्याची कामे सुरू आहेत. ही कामे अर्धवट आहेत. यात्रेपूर्वी ही कामे त्वरीत पूर्ण करावीत, अशी मागणी यात्रा समितीने केली.

--

मिरवणूक मार्गावरील कामे पूर्ण करण्याचे आदेश नगरअभियंता संदीप कारंजे आणि सहकाऱ्यांना दिले आहेत. डिसेंबरअखेर सर्व काम पूर्ण हाेतील. लवकरच एक आढावा बैठक घेण्यात येईल.

- विजय खाेराटे, अतिरिक्त आयुक्त, मनपा.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Siddheshwar Yatraसोलापूर सिद्धेश्वर यात्राSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका