शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

हेल्पलाईनवर विचारणा होते ती व्हॅक्सिनची; आता रुग्णही घटले अन्‌ कॉलही झाले कमी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 14:17 IST

सोलापुरातील कोरोना वॉर रूम : आता युवक-युवती सल्ला घेऊनच घेतात लस

सोलापूर : कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध करणे, विलगीकरण, क्वारंटाईन सेंटर यासाठी पॉझिटिव्ह रुग्णांना डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी जिल्हा प्रशासन व महापालिकेतर्फे कोरोना वॉर रूम सुरू करण्यात आली. येथील हेल्पलाईनवर एप्रिल महिन्यात कॉल्सचे प्रमाण प्रचंड वाढले होते. जून महिन्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरताच बेड उपलब्धतेबाबत येणारे कॉल जवळपास बंद झाले आहेत. आता व्हॅक्सिनेशनसाठी कॉल येत आहेत. यात प्रामुख्याने १८ वर्षांवरील युवकांचा समावेश आहे.

एप्रिल महिन्यात कोरोना संक्रमणाचा प्रकोप सुरू असताना हेल्पलाईनवरील कर्मचाऱ्यांना सतत कॉल येत होते. मात्र, जून महिना सुरू होताच रुग्णांची संख्या कमी झाल्याने मागील दोन आठवड्यांत हेल्पलाईनवर येणारे कॉल कमी झाले आहेत. मात्र, लसीकरणाबाबत विचारणा होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

आम्हाला लस कधी मिळणार?

१८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्याची घोषणा करण्यात आली. परंतु, लसीचा पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्याने ३० वर्षांवरील नागरिकांना काही केंद्रांवर लसीचे डोस दिले जात होते. शासनाने घोषणा केल्याने १८ वर्षांवरील युवक लसीसाठी हेल्पलाईनवर कॉल करून विचारणा करत आहेत. आम्हाला लस कधी मिळणार, यासाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची, कुठली लस उपलब्ध आहे, कोव्हॅक्सिन चांगली की कोविशिल्ड, अशी विचारणा करतात.

-----

मेडिक्लेम लागू होईल का?

  • कोरोनाचे रुग्ण वाढत असताना बेडची विचारणा होत होती. रेमडेसिविर इंजेक्शनसाठी अनेक जणांनी फोन केले.
  • रुग्णालय व क्वारंटाईन सेंटरमधील जेवण, स्वच्छता, डॉक्टरांचे राऊंड याबाबत तक्रारी हेल्पलाईनवर येत होत्या.
  • रुग्णाला मेडिक्लेम लागू करण्यासाठी अडचणींबाबत अधिक विचारणा झाली. प्रक्रिया जाणून घेण्यासाठी कॉल करण्यात आले.

 

नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून हेल्पलाईनची सुरुवात करण्यात आली. त्याचा शहर व जिल्ह्यातील अनेक नागरिकांना फायदा झाला. अनेकांपर्यंत पोहोचून मदत करण्यासाठी हेल्पलाईनची मदत झाली.

- भारत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी.

------

तारीख कॉल

  • १ मे ३००
  • १५ मे २६४
  • १ जून १३५
  • १५ जून ३०
  • २० जून १६
टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य