शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
8
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
9
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
10
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
11
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
12
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
13
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
14
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
15
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
16
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
17
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
18
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
20
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

अमृत योजनेच्या कामामुळे सोलापूरातील पाणी वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 16:43 IST

आॅक्टोबरपर्यंत मुदत : पंप बदलण्याच्या कामाला वेग

ठळक मुद्देअमृत योजनेतील इलेक्ट्रिक पंप बसविण्याचे काम बडगुजर कंपनीला दिलेअमृत योजनेतील काही कामात बदल सुचविण्यात आलासोरेगाव जलवाहिनीतून १५ दशलक्ष लिटर पाणी वाढले

सोलापूर : अमृत योजनेच्या कामामुळे सोरेगाव जलवाहिनीतून १५ दशलक्ष लिटर पाणी वाढले आहे, अशी माहिती आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी  दिली. 

अमृत योजनेतील काही कामात बदल सुचविण्यात आला आहे. या बदलास परवानगी मिळण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. सध्या सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रात अमृत योजनेतून जी कामे हाती घेण्यात आली, त्यामुळे पाण्यात वाढ झाली आहे. फिल्टर बेड व इतर कामांच्या सुधारणेमुळे भविष्यात पाणी वितरणात आणखी सुसूत्रता येणार आहे. काम रखडले आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे पाण्याच्या टाकीखेरीज या ठेकेदाराला कोणत्याही कामासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही.

गळतीमुळे पाणी वाया जाते. वडकबाळ ते सोरेगाव आणि सोरेगाव ते जुळे सोलापूर टाकीपर्यंत जलवाहिनी जुनी आहे. उजनी जलवाहिनीवरील वॉल्व्ह बदलणे व जॉईन्ट जोडणीचे काम केल्याने गळती कमी झाली आहे. पाकणी शुद्धीकरण केंद्रातील कामे सुरू आहेत. केगाव ते जुने पुणेनाकापर्यंतची जलवाहिनी बदलण्याचे काम सुरू आहे. कॅनॉलजवळील जोड देण्यासाठी शटडाऊन घ्यायचे आहे. पण विजेचा व्यत्यय व जलवाहिनी गळतीमुळे पाणी वितरणात समस्या येत आहेत.

विश्रांती चौकातील जलवाहिनीला मोठी चिर पडली होती. दुरुस्तीला बराचवेळ झाला. अशा कारणांमुळे उजनीवरील शटडाऊन पुढे ढकलले आहे असे आयुक्त डॉ. ढाकणे यांनी सांगितले. अमृत योजनेतील इलेक्ट्रिक पंप बसविण्याचे काम बडगुजर कंपनीला दिले आहे. या कंपनीने वेळेच्या आधी हे काम केले तर बक्षिसे दिली जाणार आहेत. त्यामुळे या कंपनीने पंप बदलण्याचे काम सुरू केले आहे. पंप बदलल्यानंतरही पाणीपुरवठ्यात मोठी सुधारणा होणार आहे. पाणी वितरण व्यवस्था सुधारणेसाठी बरेच प्रयत्न करण्यात येत असल्याचे आयुक्त डॉ. ढाकणे यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :SolapurसोलापूरWaterपाणीSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका