शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
‘भाजपा ४०० जागा कदाचित चंद्रावर जिंकेल, भारतात मात्र…’ आदित्य ठाकरेंचा खोचक टोला 
3
....तोपर्यंत तपास यंत्रणा वकिलांना समन्स बजावू शकत नाहीत; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
4
आता उगाच उठून सोशल मीडियावर काहीही बोलता येणार नाही! 'या' देशाने इन्फ्लुएन्सर्सबाबतीत घेतला मोठा निर्णय
5
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
6
१ कोटी रुपयांचं घर घेण्यासाठी तुमची मिनिमम सॅलरी किती असली पाहिजे? पाहा काय म्हणताहेत एक्सपर्ट्स
7
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
8
Swami Samartha: घरातील देवांची मूर्ती, प्रतिमा यातील चैतन्य कसे ओळखावे? उपासना कशी वाढवावी? वाचा
9
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
10
घर घ्यायचंय? फ्लॅट घेताना स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचा खर्च किती येतो? कुठे होईल पैशांची बचत
11
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
12
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
13
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
14
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
15
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
16
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
17
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
18
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
19
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
20
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग

सोलापुरात हेल्मेटसक्ती ; एकीकडे हेल्मेट बाजारात...दुसरीकडे हेल्मेट कोर्टात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 12:17 IST

२६ डिसेंबरला सुनावणी; जिल्हाधिकाºयांसह आरटीओ, पोलीस आयुक्तांना म्हणणे मांडण्यासाठी कोर्टात हजर राहण्याचे आदेश

ठळक मुद्देहेल्मेट सक्तीच्या विरोधात शंभूराजे युवा संघटनेसह दिवाणी न्यायालयात दावा दाखल४८ जणांकडून १ लाख १५ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आलाजिल्हाधिकाºयांच्या आदेशान्वये शहर आणि जिल्ह्यात हेल्मेट न घालणाºयांविरुद्धची कारवाई

सोलापूर : हेल्मेट सक्तीच्या विरोधात शंभूराजे युवा संघटनेसह दिवाणी न्यायालयात दावा दाखल करण्यात आला. यावर न्यायालयाने जिल्हाधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी न्यायालयाला म्हणणे सादर करावे, असा आदेश बजावला आहे. सहदिवाणी न्यायाधीश खेडकर यांच्यापुढे ही सुनावणी झाली. २६ डिसेंबर रोजी यावर सुनावणी होणार आहे. 

शंभूराजे युवा संघटनेने न्यायालयाकडे केलेल्या दाव्यात म्हटले आहे की, जिल्हाधिकाºयांच्या उपस्थितीत १८ डिसेंबर रोजी रस्ता सुरक्षा समितीची बैठक पार पडली. यात त्यांनी प्रशासनाला हेल्मेट सक्ती करण्याचे आदेश दिले. त्यानुसार उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांनी या बैठकीचा संदर्भ देत कार्यालयीन आदेश काढला. यात २५ डिसेंबरपर्यंत ५ हजार खटले दाखल करुन १०० टक्के अंमलबजावणी करावी, असे लेखी पत्र काढले होेते.  या विरोधात शंभूराजे युवा संघटनेच्या वतीने अध्यक्ष नितीन चव्हाण यांनी अ‍ॅड. संतोष होसमनी यांच्या वतीने प्रातिनिधीक स्वरुपाचा दावा सोलापूरच्या सह दिवाणी न्यायालयात दाखल करण्यात आला. 

न्यायालयासमोर दावाकर्त्याच्या वतीने बाजू मांडताना वकिलांनी प्रशासनाचा उद्देश हा नागरिकांची काळजी घेणे अथवा नाही.   हेल्मेट सक्ती करून नागरिकांवर  खटले दाखल करणे व महसूल गोळा करणे असा आहे, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. कोणताही सारासार विचार न करता एकतर्फी आदेश पारित करणे लोकशाहीला घातक असल्याचे दाखवून दिले आहे. न्यायालयाने या बाबींचा विचार करून न्यायालयाने जिल्हाधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी २६ डिसेंबर रोजी हजर राहण्याचे आदेशित केले आहे.

विना हेल्मेट... १.४२ लाखांचा दंड वसूल- दरम्यान, जिल्हाधिकाºयांच्या आदेशान्वये शहर आणि जिल्ह्यात हेल्मेट न घालणाºयांविरुद्धची कारवाई सुरुच आहे. शुक्रवारी शहरामध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि शहर वाहतूक शाखेने कारवाई केली. यात ६३ वाहनांची तपासणी केली. त्यामध्ये ४२ जण दोषी आढळले. ४८ जणांकडून १ लाख १५ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. अकलूज विभागाच्या आरटीओ कार्यालयाने ३३ जणांची तपासणी केली. ४८ जणांचे हेल्मेट वापरण्यासाठी समुपदेशन करण्यात आले आणि २७ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला. दोन्ही विभागामध्ये मिळून एकूण १ लाख ४२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती सोलापूर विभागाचे  सहा. उपप्रादेशिक अधिकारी सतीश जाधव आणि अकलूज विभागाच्या अर्चना गायकवाड यांनी दिली.

टॅग्स :SolapurसोलापूरRto officeआरटीओ ऑफीसSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस