शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जोराच्या पावसाने १७९८ ट्रान्स्फॉर्मर, शंभराहून अधिक फिडर पडले बंद

By appasaheb.patil | Updated: September 19, 2020 17:13 IST

विद्युत पोल कोसळले : पंढरपूर, माळशिरस, सांगोला भागात महावितरणचे नुकसान

ठळक मुद्देज्या भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे तेथील दुरुस्तीची कामे वेगाने हाती घेतली आहेतसोलापूर जिल्ह्यातील आतापर्यंत ९० टक्के दुरुस्तीचे काम पूर्ण करून वीजपुरवठा सुरळीत कॉन्ट्रॅक्टर, महावितरणचे अधिकारी, कर्मचारी यांची संयुक्त २५ विशेष पथके अहोरात्र तैनात करण्यात आली

सोलापूर : विजांचा कडकडाट़़़ वादळी वारे़़़जोराचा पाऊस़़़़यामुळे पंढरपूर, माळशिरस, सांगोला, मंगळवेढा आदी भागात महावितरणचे नुकसान झाले आहे़ अवकाळी पावसामुळे १७९८ ट्रान्स्फॉर्मर, १०७ फिडर बंद पडले आहेत़ याशिवाय ५२ गावांचा वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती महावितरणसोलापूरचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी ‘लोकमत’ ला दिली.

बुधवारी आणि गुरुवारी रात्रभर मुसळधार पाऊस झाला़ पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोटसह सोलापूर शहराला पावसाने चांगलेच झोडपले़ वादळी वाºयामुळे झालेल्या पावसात महावितरणच्या विद्युत तारांसह विजेचे खांब कोसळले़ यात काही ट्रान्स्फॉर्मर, फिडर, उपकेंद्रातील साहित्यांचे नुकसान झाले़ त्यामुळे काही गावातील वीजपुरवठा खंडित झाला होता़ अनेक भागात पाणी साचल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या कामाला अडचणी येत होत्या; मात्र महावितरणच्या कर्मचाºयांनी जिवाची पर्वा न करता विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.

२५ पथके अन् ४०० कर्मचारी...पावसामुळे खंडित झालेल्या भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण सोलापूर मंडलाचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्ट्रॅक्टर, महावितरणचे अधिकारी, कर्मचारी यांची संयुक्त २५ विशेष पथके अहोरात्र तैनात करण्यात आली आहेत़ याशिवाय वीज वितरणच्या ४०० कर्मचाºयांनीही दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे़ विद्युत तारा जोडणे, नादुरुस्त फिडर दुरुस्त करणे, ट्रान्स्फॉर्मर बसविणे आदी कामे पथकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत़ 

ज्या भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे तेथील दुरुस्तीची कामे वेगाने हाती घेतली आहेत़ सोलापूर जिल्ह्यातील आतापर्यंत ९० टक्के दुरुस्तीचे काम पूर्ण करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आलेला आहे़ वीजग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणची विशेष पथके, कॉन्ट्रॅक्टर, जनमित्र, तंत्रज्ञ, अभियंते, शाखाधिकारी अहोरात्र स्पॉटवरून उभे राहून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम करीत आहेत़- ज्ञानदेव पडळकर,अधीक्षक अभियंता, सोलापूर मंडल 

टॅग्स :SolapurसोलापूरmahavitaranमहावितरणRainपाऊस