शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

उजनी क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला; दौंडमधून धरणात ५ हजार क्युसेकचा विसर्ग

By appasaheb.patil | Updated: September 24, 2023 15:52 IST

मागील काही दिवसांपासून सोलापूर शहरासोबतच जिल्ह्यातील विविध भागात पाऊस पडत नसल्याने शेतकर्‍यांना चिंता लागली होती.

सोलापूर : सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणार्‍या  उजनी धरणातील पाणीसाठा कमी अधिक प्रमाणात होत असल्याने सोलापूरकरांची धाकधूक वाढली होती. मात्र मागील दोन दिवसांपासून पुण्यात व उजनी धरण परिसरात पडत असलेल्या पावसामुळे दौंडमधून धरणात ५००५ हजार क्युसेकने पाणी येत आहे.  सध्या उजनी धरणात २१.६८ टक्के पाणीसाठा आहे. 

मागील काही दिवसांपासून सोलापूर शहरासोबतच जिल्ह्यातील विविध भागात पाऊस पडत नसल्याने शेतकर्‍यांना चिंता लागली होती. चांगला पाऊस न पडल्याने शेतीपिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. मागील सात दिवसात कधी जास्त तर कधी कमी प्रमाणात पाऊस पडत आहे. त्याचबरोबरच पुणे जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढला असून उजनी धरणात दौंडमधून पाणी येत आहे. सध्या सोलापूर जिल्हयामध्ये पावसाने ओढ दिल्यामुळे टंचाई सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. उजनी धरणामध्येही पाण्याची पुरेशी आवक न झाल्यामुळे परिस्थिती आणखी कठीण झालेली आहे. 

अशा परिस्थितीत भीमा नदीवरील सोलापूर, पंढरपूर, सांगोला शहरासह इतर ग्रामीण पाणी पुरवठा योजनांना पिण्यासाठी पाण्याची टंचाई निर्माण होण्याची परिस्थिती आली होती. भीमा नदीवरील सोलापूर, पंढरपूर, सांगोला शहरासह इतर ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या पिण्याच्या पाणी पुरवठा योजनासाठी १९ सप्टेंबर २०२३ पासून उजनी धरणातून ४.५ टीएमसी पाणी भीमा नदीमध्ये सोडण्यात आले आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर