शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पोटनिवडणुकीनंतर पंढरपुरात कहर; कोरोनाचे २० दिवसांत १२५ बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 02:23 IST

६ एप्रिल २०२१ पूर्वी पंढरपूर तालुक्यात अवघे ९ हजार २६० सक्रिय रुग्ण होते. २५५ जणांना आपला प्राण गमवावा लागला होता. तर मंगळवेढा तालुक्यात अवघे २०६० सक्रिय रुग्ण होते

मोहन डावरे

पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीनंतर परिसरात कोरोनाने कहर केला असून, रुग्णसंख्या पाचपटीने वाढली आहे. याचबरोबर गेल्या २० दिवसांत १२५ जणांनी प्राण गमावला आहे. त्यामुळे अख्ख्या सोलापूर जिल्ह्यावर कडक लॉकडाऊन करण्याची नामुष्की ओढवली आहे. बाधित रुग्णसंख्या सापडण्याची मोहीम फेब्रुवारीपासून सुरू झाली असली तरी दुसऱ्या लाटेला प्रशासन, राजकीय नेत्यांनी फारसे गांभीर्याने न घेण्याची मोठी चूक केली आणि या काळातच पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीची घोषणा झाली. निवडणूक १७ एप्रिलला झाली असली तरी तयारी मात्र फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. या कालावधीत कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून कार्यकर्त्यांच्या आढावा बैठका, मोठ्या नेत्यांचे दौरे नियमितपणे सुरू होते.

६ एप्रिल २०२१ पूर्वी पंढरपूर तालुक्यात अवघे ९ हजार २६० सक्रिय रुग्ण होते. २५५ जणांना आपला प्राण गमवावा लागला होता. तर मंगळवेढा तालुक्यात अवघे २०६० सक्रिय रुग्ण होते. तर ५२ जणांना प्राण गमवावा लागला होता. हीच आकडेवारी १७ एप्रिल २०२१ या निवडणुकीच्या दिवसापर्यंत वेगाने वाढली. त्यामध्ये सक्रिय रुग्णसंख्या १० हजार ६८०, तर मृत्यूची संख्या २६५ पर्यंत गेली होती. मंगळवेढा तालुक्यातही रुग्णसंख्या वाढून २६०० वर पोहोचली, तर मृत्यूही ७० च्या आसपास होते.आजअखेर पंढरपूर तालुक्यात १६ हजार ५०० पेक्षा जास्त रुग्ण सापडले  तर ३३५ जणांचा मृत्यू झाला. मंगळवेढा तालुक्यात १५ हजार ५०० पेक्षा जास्त रुग्ण असून, ११० जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. ...................कोट ... पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यांत कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढत आहे. अख्खी घरे बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोना रुग्णांना भेटण्यासाठी येणारे नातेवाईक सुपरस्प्रेडर ठरत आहेत.     - सचिन ढोले, प्रांताधिकारी, पंढरपूर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसPandharpurपंढरपूर