शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर शहरात १४०० दुकानातून केश कर्तनाचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 13:13 IST

एसी केश कर्तनालयातही होतेय वाढ; नव्या बदलांना स्वीकारतोय नाभिक समाज

ठळक मुद्देशहरातील सर्व दुकानांसाठी नियमावली, दरपत्रके या संस्थेतर्फे ठरविण्यात येतातदोन दुकानांमध्ये २५० मीटर अंतर असावे, असा नियमही करण्यात आलाकेश कर्तनाच्या पद्धतीत मोठ्या प्रमाणात बदल झाले असून, नाभिक समाजाने या बदलांना आपलंसं केलं

शितलकुमार कांबळे

सोलापूर : शहरात सुमारे एक हजार चारशे केश कर्तनालयामधून केश कर्तनाचे काम केले जाते. केश कर्तन करण्याचे काम हे नाभिक समाज बंधूच करतात. बलुतेदारीच्या काळामध्ये केश कर्तन करण्यासाठी कारागिरांना लोकांच्या घरोघरी जावे लागत असायचे. नाभिक बंधूंचा हा प्रवास हा आता एसी दुकानापर्यंत आला आहे. केश कर्तनासोबत इतर काही सेवा या दुकानातून दिल्या जातात.

आधुनिकीकरणाकडे जाणारा हा व्यवसाय वेगाने बदलत आहे. यात चांगली बाब म्हणजे सोलापुरातील नाभिक समाज बांधवही आधुनिक होत आहेत.

केश कर्तनाच्या पद्धतीत मोठ्या प्रमाणात बदल झाले असून, नाभिक समाजाने या बदलांना आपलंसं केलं आहे. २००२ मध्ये फक्त एका दुकानात एसी होता. आता याचीही संख्या ३५० पेक्षा अधिक झाली आहे. केश कर्तनालय चालविणाºयांना स्वच्छतेचे महत्त्व पटल्याने या व्यवसायात खूप बदल होत आहेत. ज्यांनी आपला व्यवसाय एका खोक्यातून सुरू केला होता, तेही आता चांगल्या पक्क्या दुकानात आपला व्यवसाय चालवित आहेत. दुकानात चांगल्या प्रकारचे फर्निचर, आरसे, केश कर्तन करण्यासाठी लागणारे अत्याधुनिक साधनेदेखील आता उपलब्ध आहेत. ज्या दुकानदारांना आधुनिकीकरण करताना अडचणी येतात, त्यांना संस्थेतर्फे मदत केली जाते.संत सेना नाभिक समाज दुकानदार संंघ सेवाभावी संस्था शहरातील केश कर्तन दुकानदारांचे नेतृत्व करते.

शहरातील सर्व दुकानांसाठी नियमावली, दरपत्रके या संस्थेतर्फे ठरविण्यात येतात. सर्वच समाज बांधवांना व्यवसाय करताना ही संस्था काम करते. दोन दुकानांमध्ये २५० मीटर अंतर असावे, असा नियमही करण्यात आला आहे. यामुळे दुकानदारांमधील स्पर्धा कमी होऊन सर्वांनाच न्याय मिळेल, असा यामागचा उद्देश असतो. शहरात असणाºया एक हजार चारशे दुकानांमध्ये संवाद साधणे अवघड असल्याने १३ विभागीय पदाधिकाºयांची निवड करण्यात आली आहे. 

नीलम नगर, विजापूर रोड, जुळे सोलापूर, एस.टी. स्टँड, अवंती नगर, नवी पेठ, माणिक चौक, अशोक चौक, पाथरुट चौक, मौलाली चौक, भवानी पेठ, कन्ना चौक असे एकूण १३ विभाग करण्यात आले आहेत.

अडीचशे मीटरचा नियम...- दोन दुकानांमध्ये २५० मीटर अंतर असावे, असा नियमही करण्यात आला आहे. यामुळे दुकानदारांमधील स्पर्धा कमी होऊन सर्वांनाच न्याय मिळेल, असा यामागचा उद्देश असतो. शहरात असणाºया एक हजार चारशे दुकानांमध्ये संवाद साधणे अवघड असल्याने १३ विभागीय पदाधिकाºयांची निवड करण्यात आली आहे. 

शहरातील मोजक्या व्यक्तींना चांगल्या पद्धतीने केश कर्तनाची सेवा मिळते, यावर विश्वास नसायचा. असे लोक पुण्यात जाऊन केस कापून येत होते. आता सोलापुरातील या व्यवसायात बदल झाला असून, ग्राहकांना चांगल्या सेवा देण्याबरोबरच नव्या व आकर्षक पद्धतीने केश कर्तन करण्याचे प्रशिक्षित कारागीर आपल्या शहरात काम करत आहेत. यामुळे पुण्यात केस कापायला जाणारे लोक आता तिथे जात नाहीत. - संजय धोत्रे, अध्यक्ष, संत सेना नाभिक दुकानदार संघ, सोलापूर.

टॅग्स :Solapurसोलापूर