शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

हगलूरच्या डान्सबार, आर्केस्ट्राबारवर पोलीसांची धाड; ६ महिलांसह २८ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2022 18:37 IST

विदेशी दारू, डी.जे. मुझिकल साउन्ड सिस्टीमसह एकूण १४ लाख ४६ हजार ७२५ रूपये किंमतीचे साहित्य जप्त

सोलापूर : पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते , अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांना सोलापूर जिल्हयातील अवैधरित्या चालणा-या धंदयावर कडक मोहिम राबवून कारवाई करण्याबाबत आदेशित केले. त्यानुसार  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सर्व अधिकारी व अंमलदार यांना माहिती काढून अवैध धंदयावर कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या होत्या.

स.पो.नि. नागनाथ खुणे व त्यांचे पथक अवैध धंदयावर कारवाई करण्यासाठी तुळजापूर रोडवरील मश्रुम गणपतीजवळ हजर असताना त्यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशिर बातमी मिळाली की,  मौजे हगलूर ता. उत्तर सोलापूर गावच्या शिवारात हगलूर ते दहिटणे जाणारे रोड लगत असलेल्या एम.ए.कॅपीटल रेस्टाॅरंन्ट अन्ड बार’’ च्या आवारातील हाॅलमध्ये बेकायदा बिनापरवाना बारमध्ये काही महिला अंगावर तोडके कपडे घालून विभित्स हावभाव व अंगविक्षेप करून डि.जे. म्युझिकच्या तालावर अश्लील नृत्य करीत असलेबाबत खात्रीशिर बातमी मिळाली. त्यावरून स.पो.नि. नागनाथ खुणे यांनी तात्काळ सदरबाबत वरिश्ठांना कळवून सदर ठिकाणी कारवाई करण्याकरिता अतिरिक्त पोलीस कुमक मागवून घेतल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेकडील स.पो.नि. नागनाथ खुणे व सपोनि अनिल सनगल्ले व त्यांचे पथक, सोलापूर तालुका पोलीस ठाणेचे पो.स.ई. शिवकुमार जाधव व त्यांचे पथक असे ‘‘एम.ए.कॅपीटल रेस्टाॅरंन्ट अॅन्ड बार’’ च्या आत जावून पाहिले असता, तेथील स्टेजवर  ६ महिला अंगावर तोडके कपडे घालून विभित्स हावभाव व अंगविक्षेप करून डि.जे. म्युझिकच्या तालावर अश्लील नृत्य करीत होत्या, समोरील  बाजूस सोफयावर काही प्रेक्षक ग्राहक म्हणून बसलेले दिसून आलेे. तेंव्हा त्यातील काही प्रेक्षक स्टेजकडील नर्तकीकडे पाहून अश्लील हावभाव करून संगिताच्या तालावर नाचत असताना मिळून आले. तेथे उपस्थित असलेल्या बार मॅनेजरकडे आॅर्केस्ट्राबार परवाना बाबत विचारपूस केले असता, त्याने परवाना नसल्याचे सांगितले. सदर बारमधून *डी.जे. म्युझिकल साउन्ड सिसस्टिम, दोन कुलर, एक लॅपटाॅप, लाईट सिस्टिम, विदेशी दारूचे क्वार्टर व बिअरचा साठा, तसेच १५ मोटार सायकली असा एकूण १४ लाख ४६ हजार ७२५ रू. किंमतीचे साहित्य जप्त करून सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे गुरंन 555/2022 भादविसंक 294, 34 प्रमाणे व महाराश्ट्र राज्य दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 ई प्रमाणे संबंधीतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी, सोलापूर विभाग सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांचे नेतृत्वाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस  निरीक्षक  नागनाथ खुणे, अनिल सनगल्ले, पो.स.ई. शिवकुमार जाधव पोलीस अंमलदार संदीप काशीद, श्रीकांत गायकवाड, बापू शिंदे, प्रकाश कारटकर, धनाजी गाडे, आबासाहेब मुंडे, मोहन मनसावाले, लालसिंग राठोड, अक्षय दळवी, अजय वाघमारे, चालक समीर शेख, प्रमोद माने, महिला अनिसा पटेल, सुनंदा झळके,  सोलापूर तालुका पोलीस ठाणेचे हवेल जाधव, शिवाजी मोरे यांनी बजावली आहे.

 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसhotelहॉटेलCrime Newsगुन्हेगारी