शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकमार्गे पुण्याकडे निघालेला २८ लाखांचा गुटखा सांगोला पोलिसांनी पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2021 12:21 IST

सोलापूर ग्रामीण पोलिस अन् अन्न व औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई

सांगोला : कर्नाटक (अथनी) येथून सांगोला मार्गे  पुण्याकडे जात असताना पोलीस अधिकारी व अन्न भेसळ व औषध  प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी  सुमारे १० लाखांची दोन वाहने पकडून सुमारे २८ लाख ३७ हजार ३६० रुपयाचा प्रतिबंधित गुटखा पकडून जप्त केला. ही कारवाई रविवारी रात्री ११ ते ११:३० च्या दरम्यान सांगोला - महुद रोड वरील शिवणे व एखतपूर पाटी येथे करण्यात आली. पोलीस व अन्नभेसळ प्रशासन अधिकाऱ्यांनी एकाच रात्री एकाच रोडवर दोन ठिकाणी प्रतिबंधक गुटखा पकडल्याने चोरून गुटखा विक्री करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेतसांगोला पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर, पोलीस उपनिरीक्षक राजगुरू, पोलीस नाईक बाबासाहेब पाटील, पोलीस नाईक कोरे पोलीस नाईक देवकते, पोलीस कॉन्स्टेबल गणेश मेटकरी यांनी सांगोला महुद रोड पेट्रोलिंग करताना शिवणे गावाजवळ एम एच-१२ एलटी-४३२८ या पिकअपमधून पुण्याकडे जाणारा १५  लाख १३हजार १२० रुपयांचा गुटखा पकडला.

 अन्न व भेसळ प्रशासन सहाय्यक आयुक्त प्रदिप राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी अ.वाय. इलागोर व अन्न सुरक्षा अधिकारी उ.सु. भुसे रोडवर एखतपूर पाटीजवळ एम एच-१२-एस एक्स-१२४० अशोक लेलँड या टेम्पोतून १३ लाख २४ हजार २४० रुपयांचा गुटखा असा सुमारे २८ लाख ३७ हजार ३६० रुपयाचा गुटखा पकडला. या कारवाईत पोलिसांनी प्रवीण दत्तात्रय खांडेकर व  चेतन दत्तात्रय खांडेकर तसेच बाबू धुळा काळे ( खैरणे ता. जत जि. सांगली) या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरsangole-acसांगोलाSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस