शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

टॉवेल्सच्या मानवी साखळीची गिनिज बुकमध्ये नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 12:12 IST

सोलापुरातील दोन हजार ४८ जणांचा होता सहभाग : इटलीचा विक्रम सोलापूरकरांनी मोडला

सोलापूर : टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या माध्यमातून २७ सप्टेंबर रोजी झालेल्या टॉवेलच्या मानवी साखळीच्या विक्रमाची नोंद गिनीज बुकमध्ये झाली आहे. शुक्रवारी (ता. ५) रात्री हा विक्रम झाल्याची घोषणा गिनीज बुकने केली. शहरात २५ ते २७ सप्टेंबरदरम्यान व्हायब्रंट टेरीटॉवेलचे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन झाले होते. या प्रदर्शनाचा एक भाग म्हणून हा विक्रम करण्यासाठी लिंगराज वल्याळ मैदानावर सोलापूरकरांनी हजेरी लावली होती.

या विक्रमाच्या माध्यमातून शहराचे नाव जगभर पोहोचविण्यासाठी सोलापूरकरांनी सकाळी आठ ते दुपारी १२ वाजेपर्यंत दोन हजार ४८ लोक उभे राहत टॉवेलच्या साखळीने आपल्यातल्या एकतेचा प्रत्यय दिला होता. 

विश्वविक्रमाची नोंद करण्यासाठी तरुणांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. पांढºया रंगाच्या कपड्यांचा पेहराव, हातामध्ये पांढºया रंगाचा टॉवेल पकडून उभे राहत सुमारे चार तास सोलापूरकरांनी कष्ट घेतले होते. नियोजनासाठी स्वयंसेवकांनीही मेहनत घेतली. मैदानात पावसाचे पाणी, चिखल असूनही नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. उपक्रमाची निर्धारित वेळ पूर्ण झाल्यानंतर मैदानावर जल्लोष करण्यात आला होता. 

सोलापूरकरांनी घेतलेल्या कष्टाची नोंद गिनीज बुकने घेतल्याने आता खरा जल्लोष करण्याची संधी आहे.

परीक्षणासाठी ड्रोनचा वापर- २०१५ मध्ये इटलीमध्ये लोंगेस्ट ह्यूमन टॉवेल चेनचा विश्वविक्रम करण्यात आला होता. या विक्रमात एक हजार ६४६ माणसांनी टॉवेल पकडून मानवी साखळी केली होती. आता हा विक्रम सोलापूरकरांनी मोडला आहे. सोलापूर हे टेरीटॉवेल उत्पादनात सुप्रसिद्ध आहे. जागतिक स्तरावर याची नोंद व्हावी, यासाठी इटलीच्या विक्रमापेक्षा अधिक फरकाने टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशन आयोजित दोन हजार ४८ माणसांची टॉवेल साखळी उभी करण्यात आली होती. परीक्षणासाठी ड्रोन कॅमेºयाचा वापर करण्यात आला. या विक्रमावर आता सोलापूरचे नाव कोरले आहे.

टॉवेलचे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन सोलापुरात आयोजित केले होते. याला जगात आणखी चांगली प्रसिद्धी मिळावी, या उद्देशाने मानवी टॉवेलची साखळी करण्यात आली होती. आता टेक्स्टाईल क्षेत्रात सोलापूरचे नाव जगात होणार आहे. असा उपक्रम घेण्यासाठी मागील दोन वर्षांपासून प्रयत्न करत होतो. त्याला आता गिनीजची पावती मिळाल्याने खूप आनंद होत आहे. या विक्रमासाठी सोलापूरकरांनी घेतलेल्या कष्टाला सलाम. - राजेश गोसकी, अध्यक्ष, टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशन

टॅग्स :SolapurसोलापूरTextile Industryवस्त्रोद्योगguinness book of world recordगिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड