शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तपदी गुडेवार पुन्हा रुजू

By admin | Updated: August 15, 2014 00:34 IST

उच्च न्यायालयाचा आदेश : नियमबाह्य बदलीला स्थगिती

सोलापूर: महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या बदली आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. नरेश पाटील व रवींद्र घुगे यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने स्थगिती दिली आहे. जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांच्याकडे असलेला पदभार गुडेवारांनी तत्काळ स्वीकारावा, असे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर गुरुवारी रात्री पावणेआठ वाजता त्यांनी आयुक्तपदाचा पदभार घेतला.शासनाने २३ जून रोजी गुडेवार यांची मंत्रालयातील पाणीपुरवठा व ग्रामीण विकास विभागाकडे बदली करून त्यांच्या जागी मालेगावचे सहायक आयुक्त अजित जाधव यांची नियुक्ती केली. मालेगाव येथील अडचणीमुळे जाधव यांना पदभार घेण्यासाठी येता आले नाही. त्यामुळे शासनाने २७ जून रोजी दुसरा आदेश काढून जिल्हाधिकाऱ्यांकडे पदभार देऊन कार्यमुक्त होण्याचा गुडेवारांना आदेश दिला. त्याप्रमाणे गुडेवार पदमुक्त झाले. ११ महिन्यांतच गुडेवार यांची बदली करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली. सर्वपक्षीय सोलापूर बंदची हाक देण्यात आली. महापालिकेसमोर आंदोलने झाली. दरम्यान, गुडेवार यांच्या बदलीविरोधात माजी आमदार नरसय्या आडम मास्तर, चंद्रशेखर पिस्के, गुरुराज पोरे यांनी उच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल केल्या. सुनावणी वेळेस न्यायालयाने गुडेवार यांचेही प्रतिज्ञापत्र घेतले. याचिकाकर्त्यांनी गुडेवार यांनी केलेल्या कामांसंदर्भात वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांची कात्रणे न्यायालयासमोर हजर केली. केवळ राजकीय दबावापोटी त्यांची बदली करण्यात आली, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांतर्फे करण्यात आला. दोन्ही बाजूचा जोरदार युक्तिवाद होऊन १ आॅगस्टला सुनावणी पूर्ण झाली. त्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. खंडपीठाने गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता निकाल जाहीर केला. १३ पानी निकालात १६ मुद्दे विचारात घेतले आहेत. यात गुडेवारांच्या बदलीला स्थगिती देत तातडीने पदभार घेण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने त्यांनी केलेल्या कामांची दखल घेत अशा बदल्यांमुळे समाजात नकारात्मक संदेश जाईल, असे मत व्यक्त करीत शासनाला जर गुडेवारांची बदली करावयाची असेल तर त्यास न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल, असा आदेश पारित केला आहे. याबाबत गुडेवार यांनीही एक याचिका दाखल केली होती. ही याचिका आज दाखल करून घेण्यात आली. त्यामुळे हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट आहे. --------------------------असा झाला युक्तिवादया प्रकरणात याचिकाकर्त्यांचे वकील रामदास सब्बन यांनी युक्तिवाद करताना महानगरपालिकेचे आयुक्तपद हे शासन नागरी सेवेचे नसल्याने बदली आदेशाविरुद्ध गुडेवारांना ‘मॅट’मध्ये दाद मागता येत नाही, असे निदर्शनाला आणले. सरकारतर्फे महाभियोक्ता डी. जे. खंबाटा यांनी गुडेवारांची बदली त्यांच्या विनंतीवरून व प्रशासकीय कारणास्तव केल्याने कायदेशीर असल्याचा युक्तिवाद केला; पण कालावधी पूर्ण होण्याआधी राजकीय दबावातून विनंती करण्यास भाग पाडले जाऊ शकते, असा मुद्दा पुढे आला. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. सुभाष गुटले, डी. जी. धानुरे, अमरनाथ बोद्धूल तर सरकारतर्फे ए. बी. वाग्यानी, पी. जी. सावंत, आयुक्त जाधव यांच्यातर्फे एस. एस. पटवर्धन, अजय मगदुरे यांनी काम पाहिले.