शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

पालकमंत्र्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जातो, कामे सूचवा, सहकारमंत्र्यांनी पाठविले सोलापुरातील नगरसेवकांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 14:29 IST

राकेश कदम सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवकांच्या भांडवली निधीचा मुद्दा ऐरणीवर येण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि ...

ठळक मुद्देगेल्या दोन वर्षांपासून नगरसेवकांना प्रभागातील कामांसाठी निधी मिळालेला नाही पत्राने पालकमंत्री गटाचे नगरसेवकही गोंधळात पडले लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवकांच्या भांडवली निधीचा मुद्दा ऐरणीवर येण्याची चिन्हे

राकेश कदम

सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवकांच्या भांडवली निधीचा मुद्दा ऐरणीवर येण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि बसपाच्या नगरसेवकांनी महापालिकेत भाजपा पदाधिकाºयांवर राजकीय टोलेबाजी करण्यासाठी प्रस्ताव मांडला आहे. दुसरीकडे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दोन्ही गटाच्या नगरसेवकांकडून कामांचे प्रस्ताव मागितले आहेत. पालकमंत्र्यांना घेऊन मी मुख्यमंत्र्यांकडे जातो, असे त्यांनी नगरसेवकांना पाठविलेल्या नमूद केले आहे. या पत्राने पालकमंत्री गटाचे नगरसेवकही गोंधळात पडले आहेत. 

गेल्या दोन वर्षांपासून नगरसेवकांना प्रभागातील कामांसाठी निधी मिळालेला नाही. आता लोकसभा निवडणुकीला कसे सामोरे जायचे, असा प्रश्न भाजपाचे नगरसेवक दोन देशमुखांकडे उपस्थित करीत आहेत. या पार्श्वभूमीवर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दोन्ही गटाच्या नगरसेवकांना पत्र पाठविले आहे. मुख्यमंत्र्यांनी सोलापूरसाठी कधीही हात आखडता घेतला नाही. 

शहरातील नियोजनपूर्वक कामांची आखणी करा. एकत्रितपणे निधी मागितल्यास मुख्यमंत्री दोनशे ते अडीचशे कोटी देतील. तुमचे प्रस्ताव घेऊन मी आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत, असेही देशमुखांनी म्हटले आहे.

 सहकारमंत्र्यांच्या या पत्रानंतर पालकमंत्री गटाचे नगरसेवक संभ्रमात आहेत. रविवारी दहशतवादाविरोधात धरणे आंदोलन झाल्यानंतर सहकार मंत्री देशमुख यांनी मागितलेल्या कामांचे प्रस्ताव द्यायचे की नाही याबद्दल पालकमंत्री गटात चर्चा सुरू होती. यापूर्वी १८ कोटींच्या निधीवरुन दोन्ही गटात धुसफुस झाली होती. 

भाजपावर निशाणा -  काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, बसपाचे गटनेते आनंद चंदनशिवे यांच्यासह सहा नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत भाजपाची कोंडी करणारा प्रस्ताव मांडला आहे. राज्य शासनाकडून महापालिकेला एलबीटी अनुदानाचे ४८ कोटी रुपये येणे आहे. एलबीटी बंद झाल्यानंतर जीएसटी अनुदान सुरू झाले. जीएसटीचे दरमहा १८ कोटी ५० लाख रुपये मिळणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात १५ कोटी रुपये मिळत आहेत. दोन वर्षात जवळपास ७२ कोटी रुपये इतके अनुदान कमी आले आहे. एलबीटी आणि जीएसटी अनुदानाची १२० कोटी रुपये बाकी आहे. दोन वर्षांपासून कोणत्याही नगरसेवकांना निधी मिळालेला नाही. कोणतीही नागरी सुविधा पुरविण्यात नगरसेवक असमर्थ ठरले आहेत. शासनाने ही रक्कम त्वरित दिल्यास नगरसेवकांना निधी मिळेल.

- राज्यात आणि महापालिकेत भाजपाची सत्ता असूनही १२० कोटी रुपये मिळालेले नाहीत. सर्वपक्षीय नगरसेवकांच्या मागणीचा ठराव फडणवीस सरकारला पाठवावा, अशी मागणी आम्ही केली आहे. या निधीबाबत गेल्या दोन वर्षात काय केले याचे उत्तर भाजपाच्या पदाधिकाºयांना सभागृहात द्यावे लागणार आहे, असे चेतन नरोटे यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाSubhash Deshmukhसुभाष देशमुखVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुखPoliticsराजकारण