शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या वस्त्यांचा निधी खर्चासाठी सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायती उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 15:31 IST

अरुण बारसकरसोलापूर: लमाण तांडे व भटक्यांच्या वस्त्यांसाठी आलेल्या निधीतून विकासकामे करण्यास जिल्ह्यातील ग्रामपंचायती उदासीन असल्याचे दिसून येत असून मागील वर्षी आलेल्या निधीपैकी अवघा ३७ लाख ६३ हजार रुपये खर्च झाला आहे. ४१ तांडे व भटक्यांच्या ५४ वस्त्यांसाठी निधी मंजूर झाला असला तरी अनेक ग्रामपंचायतींनी कामेच सुरू केली नसल्याचे सांगण्यात आले.राज्य ...

ठळक मुद्देनव्याने बृहत आराखडे तयार करुन सादर करण्यासाठी पत्रनव्याने आराखडे ग्रामपंचायतींनी तयार करून मंजुरीसाठी पाठविण्याचे आवाहन विकासकामे करण्यास जिल्ह्यातील ग्रामपंचायती उदासीन

अरुण बारसकरसोलापूर: लमाण तांडे व भटक्यांच्या वस्त्यांसाठी आलेल्या निधीतून विकासकामे करण्यास जिल्ह्यातील ग्रामपंचायती उदासीन असल्याचे दिसून येत असून मागील वर्षी आलेल्या निधीपैकी अवघा ३७ लाख ६३ हजार रुपये खर्च झाला आहे. ४१ तांडे व भटक्यांच्या ५४ वस्त्यांसाठी निधी मंजूर झाला असला तरी अनेक ग्रामपंचायतींनी कामेच सुरू केली नसल्याचे सांगण्यात आले.

राज्य शासन लमाण समाज व भटक्यांच्या वस्त्यांच्या विकासासाठी वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेतून निधी दिला जातो. एकूण मिळणाºया निधीपैकी ५० टक्के निधी लमाण समाजाच्या वस्ती(तांडा)साठी व ५० टक्के निधी भटक्या समाजाच्या वस्तीसाठी दिला जावा असा नियम आहे. १७-१८ या वर्षासाठी सोलापूर जिल्ह्याला ३ कोटी रुपये निधी आला होता. त्यापैकी दीड कोटी रुपयांची कामे ४१ लमाण तांड्यासाठी तर दीड कोटीचा निधी भटक्यांच्या ५४ वस्त्यांसाठी मंजूर केला होता. यातून सिमेंट रस्ते व गटार,  पिण्याचे पाणी व अन्य कामांचा समावेश आहे. 

फेब्रुवारी २०१७ मध्ये जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली कामे मंजूर झाली. या कामांची मंजूर यादी त्या-त्या तालुक्यांच्या गटविकास अािधकाºयांना देण्यात आली. मार्चमध्ये मंजूर कामांची यादी सामाजिक न्याय विभागाने पंचायत समितीला दिली असली तरी अद्याप अनेक ग्रामपंचायतींनी कामेच सुरू केली नाहीत. जूनअखेरपर्यंत ३७ लाख ६३ हजार रुपये इतका खर्च झाला असून दोन कोटी ६२ लाख रुपये अद्यापही अखर्चित आहेत.

  • - जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना समितीत २४ जानेवारी २०१७ च्या शासन आदेशानुसार बदल करुन जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली समितीची रचना करण्यात आली.
  • - जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त, जिल्हा नियोजन अधिकारी, बांधकामचे कार्यकारी अभियंता, सर्व गटविकास अधिकारी व अन्य अधिकाºयांचा या समितीत समावेश करण्यात आला. 
  • - मागील पाच वर्षांच्या बृहत आराखड्यानुसार जिल्ह्यात १४५ लमाण तांडे व ४६१० भटक्यांच्या वस्त्या आहेत. आलेला निधी मात्र ५० टक्के लमाण तांडे व ५० टक्के भटक्यांच्या( धनगर, वडार, रामोशी व अन्य भटक्या समाजाच्या) वस्त्यांना मंजूर करण्याचा नियम आहे.
  • - उत्तर तालुक्यात चार तांडे व दोन वस्त्या, बार्शी तालुक्यात दोन तांडे व ७ वस्त्या, अक्कलकोट तालुक्यात १२ तांडे व १७ वस्त्या, दक्षिण तालुक्यात १४ तांडे व ३ वस्त्या, मोहोळ तालुक्यात ५ तांडे व चार वस्त्या, मंगळवेढा तालुक्यात ४ तांडे व ७ वस्त्या, करमाळा व पंढरपूर तालुक्यात प्रत्येकी एक वस्ती, सांगोला तालुक्यात चार वस्त्या, माढा व माळशिरस तालुक्यात प्रत्येकी तीन वस्त्या, याप्रमाणे ४१ तांडे व ५४ वस्त्यांसाठी कामे मंजूर झाली आहेत. 
  •  

नवे बृहत आराखडे - सामाजिक न्याय विभागाने पंचायत समितीमार्फत ग्रामपंचायतींना नव्याने बृहत आराखडे तयार करुन सादर करण्यासाठी पत्र दिले आहे; मात्र गटविकास अधिकाºयांंकडून प्रतिसाद मिळत नसल्याने २०१८-१९ या वर्षासाठी शासनाकडून निधी मिळण्याची शक्यता कमीच असल्याचे सांगितले जात आहे. लवकरात लवकर नव्याने आराखडे ग्रामपंचायतींनी तयार करून मंजुरीसाठी पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद